घरक्राइमIPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सचे चोरीला गेलेले सामान सापडलं; डेव्हिड वॉर्नर म्हणाला...

IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सचे चोरीला गेलेले सामान सापडलं; डेव्हिड वॉर्नर म्हणाला…

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) दिल्ली कॅपिटल्स संघाचे सामन चोरीला गेलेले सामान सापडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता, चोरांकडून पोलिसांनी चोरलेले सर्व सामान जप्त केले आहे.

इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) दिल्ली कॅपिटल्स संघाचे सामन चोरीला गेलेले सामान सापडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता, चोरांकडून पोलिसांनी चोरलेले सर्व सामान जप्त केले आहे. दिल्ली कॅपिटल्स संघातील खेळाडूंच्या क्रिकेट किटपासून बॅट, पॅड आणि इतर सामान चोरीला गेले होते. (ipl 2023 delhi capitals players missing cricket bat shoes and gloves recovered by police david warner on social media vvp96)

याप्रकरणी दिल्ली संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली आहे. तसेच, या पोस्टमध्ये पोलिसांनी सामान जप्त केल्याचे लिहिले आहे. तसेच, एक फोटो शेअर केला असून, त्यामध्ये बॅट, पॅड, ग्लोव्हज आणि इतर वस्तू स्पष्टपणे दिसत आहेत.

- Advertisement -

डेव्हिड वॉर्नर आणि फिल सॉल्टच्या ३-३ महत्त्वाच्या बॅट्सशिवाय मिचेल मार्शच्या २ बॅटही चोरीला गेल्या होत्या. याशिवाय संघातील युवा खेळाडू यश धुलच्या ५ बॅट चोरीला गेल्या. दिल्लीच्या संघातील खेळाडूंना जेव्हा त्यांचे सामान दिल्लीतील हॉटेलच्या खोलीत पोहोचले तेव्हा त्यांना याची माहिती मिळाली. सामान चोरीला गेल्याचे समजताच दिल्लीच्या खेळाडूंनी पोलिसांना माहिती दिली.

त्यानंतर तातडीने पोलिसांनी चोरांचा तपास करत चोरट्यांना पकडले. शिवाय, त्यांच्याकडून बहुतांश माल जप्त केला. यापैकी डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शच्या चोरीला गेलेल्या प्रत्येक बॅटची किंमत सुमारे १ लाख रुपये आहे.

- Advertisement -

दिल्लीचा पहिला विजय

दिल्ली कॅपिटल्ससाठी या हंगामाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाला त्यांच्या सुरुवातीच्या ५ सामन्यांमध्ये सलग पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर, संघाने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या त्यांच्या ६व्या साखळी सामन्यात ४ गडी राखून विजय मिळवला आणि या हंगामातील गुणतालिकेत आपले गुणांचे खाते उघडण्यात यश मिळविले.


हेही वाचा – हार्दिक पांड्या, केएल राहुलसह या कर्णधारांवर येणार बंदी? काय आहे कारण?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -