घरक्रीडाहार्दिक पांड्या, केएल राहुलसह या कर्णधारांवर येणार बंदी? काय आहे कारण?

हार्दिक पांड्या, केएल राहुलसह या कर्णधारांवर येणार बंदी? काय आहे कारण?

Subscribe

IPL मधील काही संघांच्या कर्णधारांवर बॅनची टांगती तलवार लटकत आहे. स्लो ओव्हर रेटमुळे या कर्णधारांना आधीच भुर्दंड भरावा लागला आहे. परंतु आता अशीच चूक अजून दोनदा केल्यास थेट कर्णधारांनाच बॅन करणार आहेत.

जगभरातील क्रिकेट प्रेमी सध्या IPL चा आनंद लुटत आहेत. परंतु असं असताना मात्र IPL मधील काही संघांच्या कर्णधारांवर बॅनची टांगती तलवार लटकत आहे. स्लो ओव्हर रेटमुळे या कर्णधारांना आधीच भुर्दंड भरावा लागला आहे. परंतु आता अशीच चूक अजून दोनदा केल्यास थेट कर्णधारांनाच बॅन करणार आहेत. ( IPL 20213 Hardik Pandya KL Rahul along with these captains will be banned What is the reason )

गुजरात टायटनचा कर्णधार हार्दिक पांड्या, राॅयल्सचा कर्णधार संजू स‌‌ॅमसन, एका सामन्यात रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सची धुरा सांभाळणारा सुर्यकुमार यादव आणि लखनऊचा कर्णधार केएल राहुल यांना स्लो ओव्हर सेटमुळे 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. स्लो ओव्हर रेटमुळे या कर्णधारांना केवळ 12 लाखांचा दंड ठोठावला नाही तर त्यांना सक्त ताकीदही देण्यात आलेली आहे. या चुकीनंतर पुन्हा या संघांनी त्याच चुका दोन वेळा केल्यास थेट कर्णधारांवरच बॅन येणार आहे. त्यामुळे या सर्व पाचही कर्णधारांना सतर्क राहावे लागणार आहे. सर्व संघांनी पहिल्यांदाच चूक केली होती. त्यामुळे कर्णधारांना दंड ठोठावण्यता आला होता.

- Advertisement -

केएल राहुलला दंड

राजस्थानवर विजय मिळाल्यानंतर केएल राहुलला दंड ठोठावण्यात आला आहे. लखनऊचा कर्णधार केएल राहुलला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. लखनऊच्या संघाने राजस्थआन राॅयल्स विरोधात खेळताना वेळेवर षटकं टाकली नाहीत. त्यामुळे कर्णधार राहुलला हा दंड ठोठावण्यात आला आहे.

( हेही वाचा: वर्षभर गुरुला शिष्याची भेट मिळेना; पंतप्रधान मोदींनी पवारांना केले दुर्लक्षित )

- Advertisement -

ICC चे नवे नियम

क्रिकेटमधील नियम व अटींसाठी असलेल्या कलम 13.8 नुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला शेवटच्या षटकांतली पहिला चेंडू निर्धारित वेळेआधी टाकणे बंधनकारक असेल, जर संघ यात अपयशी ठरला तर त्यांना 20 व्या षटकांत 30 यार्डांच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक कमी ठेवावा लागेल.

ICC च्या नियामानुसार, पहिल्या सहा षटकांनंतर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांना 30 यार्डांच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक ठेवण्याची अनुमती आहे. मात्र, आता षटकांची गती न राखल्यास शेवटच्या षटकांत चारच क्षेत्ररक्षक ठेवता येतील.

गोलंदाजाच्या बाजूला असलेले पंच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, फलंदाजाला आणि दुसऱ्या पंचाला डाव सुरु होणाऱ्या आधी निर्धारित वेळेविषयी माहिती देतील, तसेच, काही अडचणींमुळे वेळ वाया गेल्यास नव्याने निर्धारित केलेली वेळही ते सांगतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -