घरक्रीडाIPL 2024 : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अश्विन रचणार इतिहास; वाचा सविस्तर

IPL 2024 : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अश्विन रचणार इतिहास; वाचा सविस्तर

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल)17 व्या पर्वातील 14 वा सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात होणार आहे. आजचा सामना मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर म्हणजे वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल)17 व्या पर्वातील 14 वा सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात होणार आहे. आजचा सामना मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर म्हणजे वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. आजच्या सामन्यात सलग दोन सामने गमावलेल्या मुंबई इंडियन्सला पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. तसेच, राजस्थान रॉयल्सने त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे तिसरा सामना जिंकत गुणतालिकेत टॉप 4 मध्ये जाण्याचा राजस्थानचा प्रयत्न पाहायला मिळणार आहे. (ipl 2024 ravichandran ashwin become 10th player to play 200 matches in ipl mi vs rr)

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन इतिहास रचणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या सामन्यात प्रवेश करताच अश्विन एक खास विक्रम करेल. 200 आयपीएल सामने खेळणारा अश्विन हा 10 वा खेळाडू ठरणार आहे. 37 वर्षीय अश्विनने 2009 मध्ये चेन्नईकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून तो या आयपीएलमध्ये एकूण 199 सामने खेळला आहे.

- Advertisement -

महेंद्रसिंग धोनी याने IPL मध्ये सर्वाधिक 253 सामने खेळले आहेत. यापैकी धोनीने चेन्नईकडून 223 सामने खेळले आहेत. धोनीने उर्वरित 30 सामन्यांमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे प्रतिनिधित्व केले. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. रोहित आणि कार्तिक या दोघांनी 245-245 सामने खेळले आहेत. विराट कोहली (240), रवींद्र जडेजा (229), शिखर धवन (220), सुरेश रैना (205), रॉबिन उथप्पा (205) आणि अंबाती रायडू (204) यांनीही आयपीएलमध्ये 200 सामन्यांचा टप्पा पार केला.

पोलार्ड हा सर्वाधिक सामने खेळणारा परदेशी खेळाडू

- Advertisement -

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा विदेशी खेळाडू वेस्ट इंडिज संघाचा फलंदाज किरॉन पोलार्ड आहे. पोलार्डने मुंबई इंडियन्सकडून 189 सामने खेळले. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने 184 आयपीएल सामने खेळले आहेत.

दरम्यान, रविचंद्रन अश्विनने आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज, रायझिंग पुणे सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या एकूण पाच संघांतून आयपीएल खेळली आहे.. अश्विनने 199 आयपीएल सामन्यात 28.87 च्या सरासरीने 172 विकेट घेतल्या आहेत. तसेच, त्याने 13.5 च्या सरासरीने 743 धावा केल्या आहेत.

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, टीम डेव्हिड, श्रेयस गोपाल, इशान किशन, अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, क्विना माफाका, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, नमन धीर, शिवालिक शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, टिळक वर्मा, विष्णू विनोद, नेहल वढेरा, ल्यूक वुड, सूर्यकुमार यादव.

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), अबिद मुश्ताक, आवेश खान, ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, जोस बटलर, कुलदीप सेन, कुणाल सिंग राठोड, नांद्रे बर्गर, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, रायन पराग, संदीप शर्मा, शिमरोन हेटमायर, शुभम दुबे, रोवमन पॉवेल, टॉम कोहलर-कॅडमोर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जैस्वाल, युझवेंद्र चहल आणि तनुष कोटियन.


हेही वाचा – IPL 2024 : दिल्लीविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा पराभव पण, चर्चा धोनीच्या ट्वीटची

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -