घरक्रीडाIRE vs ENG T20 : विश्‍वचषक स्‍पर्धेत मोठा धक्का, आयर्लंडकडून इंग्लंडचा पाच धावांनी पराभव

IRE vs ENG T20 : विश्‍वचषक स्‍पर्धेत मोठा धक्का, आयर्लंडकडून इंग्लंडचा पाच धावांनी पराभव

Subscribe

आर्यलंड आणि इंग्लंड यांच्यात मेलबर्नमध्ये टी-२० विश्वचषकाचा २० वा सामना खेळण्यात आला. यामध्ये आर्यलंडने इंग्लंडचा पाच धावांनी पराभव केला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यामध्ये आयर्लंडने १९.२ ओव्हर्समध्ये १५७ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडसमोर १५८ धावांचं आव्हान उभं केलं. मात्र, प्रत्युत्यरात इंग्लंडचा संघ १४.३ ओव्हर्समध्ये ५ बाद १०५ धावा खेळत असताना पाऊस आला.

या सामन्यामध्ये इंग्लंडच्या फलंदाजांनी काही उत्कृष्ट कामगिरी केली नाही. कर्णधार जोस बटलर शून्य धावा काढत बाद झाला आणि अॅलेक्स हेल्सने केवळ ७ धावा काढल्या. जोशुआ लिटलने दोघांनाही बाद केले. डेव्हिड मलान ३७ चेंडूत ३५ धावा करून बाद झाला. तर मॅकार्थीच्या चेंडूवर फिओन हँडने त्याचा झेल घेतला.

- Advertisement -

आयर्लंडच्या संघाने १२ ओव्हर्समध्ये २ बाद १०३ धावा केल्या होत्या. यानंतर संघाचे उर्वरित ८ फलंदाज ५५ धावा जोडून तंबूत परतले. आयर्लंडकडून कर्णधार अँड्र्यू बालबर्नीने सर्वाधिक ६२ धावा केल्या. फिरकीपटू लियाम लिव्हिंगस्टोन आणि वेगवान गोलंदाज मार्क वुड यांनी इंग्लंडला धुळीस चारलं.

- Advertisement -

 अशी होती प्लेइंग-11 टीम

आयर्लंड : पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्पर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क अडायर, फिओन हँड, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल.

इंग्लंड: जोस बटलर (यष्टीरक्षक), अॅलेक्स हेल्स, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रूक, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड.


हेही वाचा : भारतीय संघाला मिळाले निकृष्ट दर्जाचे जेवण, सरावालाही दिला नकार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -