घरमहाराष्ट्रराज ठाकरे यांचा नाशिक दौरा लांबणीवर

राज ठाकरे यांचा नाशिक दौरा लांबणीवर

Subscribe

नाशिकमध्ये मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला असतानाच आता सर्वांचे लक्ष हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याकडे लागले होते. राज ठाकरे सोमवारपासून म्हणजे ६ डिसेंबरपासून नाशिक दौऱ्यावर जाणार होते, मात्र त्यांचा नाशिक दौरा आता आठवड्याभरासाठी पुन्हा लांबणीवर पडला आहे. नाशिक महानगरपालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना भाजपा- मनसे युती होणार का? यावर कार्यकर्त्यांसह नेत्यांना राज ठाकरेंची भूमिका हवी होती. मात्र राज ठाकरेंनी पुन्हा एकदा दौरा रद्द केल्याने मनसे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत.

फेब्रुवारी २०२२ मध्ये नाशिकसह राज्यातील जवळपास १८ महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत.यामुळे मुंबईस नाशिक, पुण्यासह अनेक भागात राज ठाकरेंकडून दौरे सुरु आहेत. दरम्यान राज ठाकरेंकडून आत्ता नाशिकवर लक्ष केंद्रीत केले जातेय. कारण नाशिक हा मनसेचा गड मानला जात होता, मात्र स्थानिक नेत्यांमधील मतभेदामुळे मनसेने नाशिकची सत्ता गमावली. परंतु राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे भाजपाच्या हाती गेलेली नाशिकमधील मनसेची सत्ता परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अमित ठाकरेंकडे नाशिकची जबाबदारी असून गेल्या काही दिवसांत अमित ठाकरेंनी अनेकदा नाशिक दौरा केला.

- Advertisement -

दरम्यान २२ सप्टेंबरला राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये येऊन १२२ शाखाध्यक्षांची नियुक्त केली. या नियुक्तीनंतर राज ठाकरे यांनी १५ दिवसांनी पुन्हा नाशिक दौऱ्यावर येणार असल्याचे जाहीर केले. मात्र राज ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याने त्यांनी नाशिक दौरा पुढे ढकलला. यानंतर ६ आणि ७ डिसेंबर असा दोन दिवस नाशिक दौऱ्यावर जाणार होते. मात्र सोमवारचा (आजचा) त्यांचा हा दौरा आठवड्याभरासाठी पुन्हा लांबणीवर पडला आहे.

राज ठाकरे आज पुणे आणि नाशिक दौरा करणार होते. मात्र त्यांनी आजचा वेळ काही खाजगी कामासाठी देत ते पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी ते मुंबईतील शिवतीर्थावर दोन दिवसानंतर स्वत: बैठक घेणार आहेत. यानंतर राज ठाकरे पुन्हा १५ आणि १६ डिसेंबरला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. तर पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा पुण्यात होणार आहे. महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात राज ठाकरे पुण्यातून करत आहेत.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -