घरक्रीडासचिनच्या ट्विटनंतर केरळमधील चाहत्यांनी मागितली मारिया शारापोव्हाची माफी; 'हे' आहे कारण 

सचिनच्या ट्विटनंतर केरळमधील चाहत्यांनी मागितली मारिया शारापोव्हाची माफी; ‘हे’ आहे कारण 

Subscribe

सचिन तेंडुलकर हे नाव कधीही ऐकले नसल्याचे विधान शारापोव्हाने एका मुलाखतीत केले होते.

सचिन तेंडुलकर हा क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक मानला जातो. मात्र, रशियाची माजी टेनिसपटू मारिया शारापोव्हाने काही वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकर हे नाव कधीही ऐकले नसल्याचे विधान एका मुलाखतीत केले होते. शारापोव्हाचे हे विधान सचिन आणि भारताच्या क्रिकेट चाहत्यांना फारसे आवडले नव्हते. यापैकी काही चाहत्यांनी शारापोव्हाच्या ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर पेजवर तिला शिवीगाळही केली होती. खासकरून केरळमधील काही चाहत्यांनी मल्याळम भाषेत आक्षेपार्ह कॉमेंट्स लिहिल्या होत्या. शारापोव्हाने त्यांच्या मल्याळम भाषेतील कॉमेंट्सचा इंग्रजीत अर्थ विचारला होता. मात्र, आता केरळमधील या चाहत्यांनी शारापोव्हाची माफी मागितली आहे. सचिनने सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी केलेले विधान या चाहत्यांना फारसे आवडलेले नाही.

- Advertisement -

सचिनचे शेतकरी आंदोलनावर ट्विट

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला प्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने पाठिंबा दर्शवणारे ट्विट केले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन या आंदोलनाला पाठिंबा मिळू लागला आहे. मात्र, भारतातील शेतकरी आंदोलन हा आंतरराष्ट्रीय मुद्दा बनला हे सचिन तेंडुलकरला अजिबातच आवडले नाही. ‘भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याच्या भूमिकेत राहू शकतात, पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि त्यांनीच भारतासाठीचे निर्णय घेतले पाहिजेत. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया,’ असे ट्विट सचिनने केले.

शारापोव्हाची माफी मागितली

सचिनने सरकारची बाजू घेणारे ट्विट केल्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियावरून बरीच टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर, बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा शारापोव्हाच्या सोशल मीडिया पेजवरमल्याळम भाषेतील कॉमेंट्स दिसल्या. सचिन तेंडुलकर कोण आहे? हे माहित नसल्याने शारापोव्हाला काही वर्षांपूर्वी ट्रोल करण्यात आले होते. मात्र, सचिन कोण आहे हे माहित नसलेलेच बरे, असे म्हणत आता केरळमधील या चाहत्यांनी शारापोव्हाची माफी मागितली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – IND vs ENG : टीम इंडिया ‘विराट’ सलामीसाठी सज्ज!


 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -