घरताज्या घडामोडीपरिणीती चोप्राच्या 'The Girl on the Train' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

परिणीती चोप्राच्या ‘The Girl on the Train’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचा बहुचर्चित चित्रपट ‘द गर्ल ऑन द ट्रेन’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट इंग्लिश चित्रपट ‘द गर्ल ऑन द ट्रेन’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तुम्ही कधीही न पाहिलेल्या परिणीतीला पाहू शकता. परिणीतीने मीरा कपूर ही व्यक्तिरेखा साकारली असून या व्यक्तिरेखेची एक रहस्यमय कहाणी आहे.

मीरा ही नुसरत नावाच्या एका मुलीवर इतकी प्रभावित होते की, तिला पाहण्यासाठी ती दररोज ट्रेन पकडून येते आणि तिच्या घराच्या आजूबाजूला फिरत राहते. नुसरत ही व्यक्तिरेखा अभिनेत्री आदिती रॉय साकारली आहे. पण एकेदिवशी नुसरतचा मर्डर होतो आणि ती एका अडचणीत सापडते. नुसरतच्या मर्डरच्या संशयाचा धागा हा मीराच्या भोवती फिरू लागतो. मीरा व्यतिरिक्त संशयाच्या जाळ्यात नुसरतचा पती पण अडकतो. नुसरतच्या पतीची व्यक्तिरेखा अविनाश टीवीने साकारली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra)

- Advertisement -

याप्रकरणी तपास करणारी पोलीस महिला अधिकारीची भूमिका कीर्ती कुल्हारीने साकारली आहे. परिणीतीचा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा चित्रपट २६ फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रिभू दासगुप्ता यांनी सांभाळली आहे.

गेल्या मार्चमध्ये परिणीताची ‘केसरी’ फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यामध्ये तिच्याबरोबर अक्षय कुमार दिसला होता. १०० कोटींच्या वर या चित्रपटाने गल्ला जमवाला. तसेच त्यानंतर परिणीतीचा सिध्दार्थ मल्होत्राबरोबर ‘जबरिया जोडी’ प्रदर्शित झाला होता. परिणीतीच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई केली आहे. माहितीनुसार, परिणीती पुन्हा एकदा अर्जुन कपूर बरोबर ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटात दिसणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘या मुर्खांना कोणी विकत घेतलं?’, अमांडा सर्नीचा भारतीय सेलिब्रिटींवर निशाणा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -