घरक्रीडाAshes Series 2021 : ॲशेससाठी स्टोक्स तयार नाही; ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटरने साधला...

Ashes Series 2021 : ॲशेससाठी स्टोक्स तयार नाही; ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटरने साधला निशाणा

Subscribe

क्रिकेटमध्ये मोठ्या कालावधीनंतर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचे पुनरागमन झाले आहे

क्रिकेटमध्ये मोठ्या कालावधीनंतर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचे पुनरागमन झाले आहे. लक्षणीय बाब म्हणजे स्टोक्सचे पुनरागमन ऐतिहासिक आणि लोकप्रिय ॲशेस मालिकेदरम्यान झाले आहे. सध्या ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेनमध्ये ॲशेस मालिकेचा पहिला सामना होत आहे. मात्र पहिल्या कसोटी सामन्यात आतापर्यंत स्टोक्सची खेळी निराशाजनर राहिली आहे. दिग्गज अष्टपैलू खेळाडू स्टोक्स पहिल्या डावात फक्त ५ धावा करून बाद झाला. गोलंदाजीत देखील स्टोक्सने निराशाजनक प्रदर्शनत केले. त्याने १२ षटकांत एकही बळी न घेता ६५ धावा दिल्या.

पहिल्या डावातील खराब खेळीनंतर स्टोक्सच्या तयारीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर फलंदाज माइक हसीने बेन स्टोक्सच्या ॲशेस मालिकेतील तयारीवर प्रश्न उपस्थित केला आहे आणि म्हंटले की मोठ्या कालावधीनंतर ॲशेस मालिकेत पुमनरागमन करणे स्टोक्ससाठी एवढे सोपे नव्हते. स्टोक्स जुलै २०२२ नंतर थेट ॲशेस मालिकेसाठी संघात परतला आहे.

- Advertisement -

माइक हसीने म्हंटले की, “आम्हाला कल्पना आहे की स्टोक्ससाठी ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाविरूध्द खेळणे कदापी सोपे नसणार आहे. त्याच्यासाठी ५-६ महिन्यांहून कमी कालावधीच्या सरावानंतर चांगले प्रदर्शन करणे खूप आव्हानात्मक असेल”. हसीने सांगितले स्टोक्सचे कित्येक नो बॉल सांगतात की तो त्याच्या जुन्या लयमध्ये नाही.

दरम्यान, स्टोक्स इंग्लंडच्या संघाचा महत्त्वाचा भाग आहे आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचे ॲशेस मधील प्रदर्शन इंग्लंडच्या संघाला एक दिशा देणारे आहे. ॲशेस मालिकेच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या २ दिवसांत ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत स्थितीत आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात इंग्लंडला फक्त १४७ धावांवर गुंडाळले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेड, डेविड वॉर्नर आणि मार्नर लाबुशेन यांच्या चमकदार खेळींच्या जोरावर पहिल्या डावात ४२५ धावांची आघाडी घेतली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा : http://IND vs SA : ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेनंतर भारताचाही नवीन प्रयोग; White ball क्रिकेटसाठी स्वतंत्र कर्णधार


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -