घरक्रीडानिल इंटरप्रायझेसची विजयी सलामी

निल इंटरप्रायझेसची विजयी सलामी

Subscribe

मुंबई शहर जिल्हा निवड चाचणी कबड्डी

निल इंटरप्रायझेस, सचिवालय जिमखाना, रिझर्व्ह बँक या संघांनी मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतील प्रथम श्रेणी व्यवसायिक गटात विजयी सलामी दिली. वडाळा येथील भारतीय क्रीडा मंडळाच्या क्रीडांगणावर सुरु असलेल्या या स्पर्धेच्या व्यावसायिक गटात निल इंटरप्रायझेसने विक्रीकर जिमखान्याचा ३०-१४ असा पराभव केला. या सामन्याच्या मध्यंतराला निलकडे २१-२ अशी मोठी आघाडी होती. निलच्या या विजयात राहुल कदम, निखिल कदम यांचा खेळ महत्वाचा ठरला.

मुंबई अग्निशमन दल कला-क्रीडाने सी.बी.सी स्पोर्ट्सला ३६-२७ असे पराभूत केले. प्रथमेश तरे, सुरज दिघे, ओमकार शिंदे अग्निशमनकडून चांगले खेळले. सचिवालय जिमखान्याने नेव्हल डॉकचा ३२-१९ असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. भारतीय रिझर्व्ह बँकेने स्वागत शिंदे, जयेश यादवच्या खेळाच्या जोरावर बेस्ट कला-क्रीडाला ३६-२५ असे पराभूत केले. साई सिक्युरिटीने पी.डी.हिंदुजा रुग्णालयावर ३१-२१ अशी मात केली.

- Advertisement -

व्यावसायिक गट पहिल्या फेरीचे इतर निकाल : १] जय मातादी विजयी वि. सेंट्रल एक्सईज (३७-३०), २] मातोश्री कॅन्सल्टंसी विजयी वि. एस.एस. खेडेकर (२८-२४), ३] जी. डब्ल्यू खामकर विजयी वि. फ्लोरिटेक (४६-१२), ४] टी.बी.एम स्पोर्ट्स विजयी वि. दी झोराष्टीयन बँक (३८-१३).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -