घरक्रीडामुंबईला अजिंक्यपद

मुंबईला अजिंक्यपद

Subscribe

विजय मर्चंट क्रिकेट स्पर्धा

मुशीर खानच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने अंतिम सामन्यात पंजाबचा एक डाव आणि ५० धावांनी पराभव करत विजय मर्चंट करंडक क्रिकेट स्पर्धेचे (१६ वर्षांखालील) अजिंक्यपद पटकावले. मुशीर खानने या सामन्याच्या दोन्ही डावांत मिळून १० विकेट्स घेत मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

चार दिवसीय अंतिम सामन्यात मुंबईचा कर्णधार आयुष जेठवाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मुंबईच्या गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवताना पंजाबचा पहिला डाव १४२ धावांवर संपुष्टात आणला. मुंबईकडून मुशीरने ५, तर कर्णधार जेठवाने २ गडी बाद केले. याचे उत्तर देताना मुंबईने आपल्या डावात ३४३ अशी धावसंख्या उभारली. मुंबईच्या आदित्य पवार (८६), स्वयम वाघमारे (६४), प्रिन्स बदियानी (४९) आणि अनुराग सिंग (४६) यांनी अप्रतिम फलंदाजी केली.

- Advertisement -

पंजाबचे फलंदाज दुसर्‍या डावात आपला खेळ सुधारतील अशी अपेक्षा होती. मात्र, मुशीरच्या भेदक गोलंदाजीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. मुशीरने ५९ धावांत ५, तर कर्णधार जेठवाने ४० धावांत ३ बळी मिळवल्याने पंजाबचा दुसरा डाव १५१ धावांवर आटोपला. त्यामुळे मुंबईने हा सामना एका डावाच्या फरकाने जिंकला.

संक्षिप्त धावफलक – पंजाब : १४२ आणि १५१ (आदित्य ३९, जसकीरत सिंग ३६; मुशीर खान ५/५९, आयुष जेठवा ३/४०) पराभूत वि. मुंबई : ३४३ (आदित्य पवार ८६, स्वयम वाघमारे ६४; इमनज्योत सिंग चहल ४/११६).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -