घरक्रीडाविराटला मदत करणे हे माझे कर्तव्य!

विराटला मदत करणे हे माझे कर्तव्य!

Subscribe

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही स्पर्धा सध्या जोरात सुरू आहे. ही स्पर्धा संपताच इंग्लंडमध्ये ३० मेपासून क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. हा विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला यजमान इंग्लंडबरोबर प्रमुख दावेदार मानले जात आहे. काही दिवसांपूर्वीच या विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून, या संघाचा कर्णधार विराट कोहलीच असणार आहे.

कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता न आल्याने त्याच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. मात्र, विश्वचषकात त्याला हे निर्णय एकट्याला घ्यावे लागणार नाहीत. त्याच्या मदतीला अनुभवी महेंद्रसिंग धोनी आणि उपकर्णधार रोहित शर्मा असणार आहेत. विराटला मदत करणे हे माझे कर्तव्यच आहे, असे रोहितचे म्हणणे आहे.

- Advertisement -

उपकर्णधार म्हणून विराटला मदत करणे हे माझे कर्तव्यच आहे. मी मागील काही वर्षे हेच करत आहे. जेव्हा धोनी कर्णधार होता, तेव्हा त्याच्या मदतीला (विरेंद्र) सेहवाग, सचिन (तेंडुलकर) आणि इतर अनुभवी खेळाडू होते. हे खेळाडू धोनीला वेळोवेळी सल्ला द्यायचे. आता आम्ही बरीच वर्षे या संघाचा भाग असल्याने कर्णधाराला मदत करणे ही आमची जबाबदारी आहे, असे रोहित म्हणाला.

तसेच त्याने पुढे सांगितले, एका खेळाडूमुळे संघ बनत नाही. संघ बनतो १५ खेळाडूंमुळे. हा संघ सर्वांचा असतो. त्यामुळे कोणत्याही खेळाडूला काही नव्या कल्पना द्यायच्या असतील किंवा काही सल्ला द्यायचा असेल, तर त्यांना तसे करण्याची या संघात पूर्ण सूट आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -