घरक्रीडाWTC : न्यूझीलंडचा संघ जागतिक कसोटी स्पर्धेच्या फायनलमध्ये 

WTC : न्यूझीलंडचा संघ जागतिक कसोटी स्पर्धेच्या फायनलमध्ये 

Subscribe

न्यूझीलंड हा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा पहिला संघ ठरला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका रद्द करण्यात आली आहे. याचा फायदा न्यूझीलंडला झाला असून त्यांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. न्यूझीलंडची गुण सरासरी ७० टक्के इतकी असून त्यांना इतर कोणताही संघ मागे टाकू शकत नाही. त्यामुळे न्यूझीलंड हा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा पहिला संघ ठरला आहे. ५ फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार असून या मालिकेचा विजेता संघ अंतिम फेरीत प्रवेश करू शकेल.

भारताचा संघ अव्वल स्थानावर

‘न्यूझीलंडने पहिल्या आयसीसी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे महत्व वाढले आहे. भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तीन संघांना अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे,’ असे आयसीसीने ट्विट केले. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानावर असून त्यांची गुण सरासरी ७० टक्के इतकी आहे. भारताचा संघ या गुणतक्त्यात अव्वल स्थानावर आहे. भारताची गुण सरासरी ७१.७ टक्के इतकी आहे. मात्र, इंग्लंडविरुद्धचे कसोटी सामने जिंकण्यात अपयश आल्यास भारताची गुण सरासरी खाली घसरेल.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा रद्द

दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने आगामी दक्षिण आफ्रिका दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका पार पडणार होती. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघही जाहीर केला होता. परंतु, दक्षिण आफ्रिकेत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ऑस्ट्रेलियाने हा दौरा रद्द केला आहे. याचा फायदा न्यूझीलंडला झाला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -