घरक्रीडा'मानसिक छळ सहन करावा लागतोय'; लवलीनाचा गंभीर आरोप, क्रीडा मंत्रालयाकडून दखल

‘मानसिक छळ सहन करावा लागतोय’; लवलीनाचा गंभीर आरोप, क्रीडा मंत्रालयाकडून दखल

Subscribe

राजकारणामुळे तयारीवर वाईट परिणाम झाला असून मानसिक छळ सहन करावा लागल्याचा गंभीर आरोप लवलीना बोरगोहेनने केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्याला होत असलेल्या त्रासाची माहिती लवलीना बोरगोहेनने दिली.

राजकारणामुळे तयारीवर वाईट परिणाम झाला असून मानसिक छळ सहन करावा लागल्याचा गंभीर आरोप लवलीना बोरगोहेनने केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्याला होत असलेल्या त्रासाची माहिती लवलीना बोरगोहेनने दिली. दरम्यान, लवलीना बोरगोहेनच्या गंभीर आरोपाची केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दखल घेतली असून, त्यांनी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) संपर्कात राहून समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे निर्देश दिले आहेत.

ऑलिम्पिक पदक विजेती आणि बॉक्सिंग मधील भारताचे आशास्थान म्हणून लवलीना बोरगोहेनला ओळखले जाते. परंतु, सद्यस्थितीत तिने केलेल्या आरोपामुळे क्रिडाक्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. (Olympic medalist boxer lovlina borgohain alleges mental harassment before commonwealth games)

- Advertisement -

“मला पदक मिळवून देण्यात ज्या प्रशिक्षकांनी मोलाची मदत केली, त्यांना सतत बदलले जात आहे. कॉमनवेल्थ विलेजमध्ये देखील यायला देत नसून त्यांना सतत त्याठिकाणाहून बदलत असल्याने मला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे”, असे लवलीना बोरगोहेनने म्हटलं आहे.

सोमवारी २५ जुलै रोजी लवलीना बोरगोहेनने आपल्याला मानसिक छळाची माहिती दिली. यंदा २८ जुलै रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्सच्या (Commonwealth Games 2022) बॉक्सिंग खेळात भारताची ऑलिम्पिक पदकविजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहेन भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

- Advertisement -

लवलिना बोरगोहेनने ट्वीटरवर पोस्ट

लवलिना बोरगोहेनने ट्वीटरवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये तिने लवलिनाचे प्रशिक्षक संध्या गुरुंगजी (Sandhya Gurung) हीला द्रोणाचार्य अवार्ड देखील मिळाले आहे. पण असे असतानाही माझ्या दोन्ही प्रशिक्षकांना ट्रेनिंगसाठी उशिराने सोडले जाते. या सर्वाचा माझ्या खेळावरही परिणाम होत आहे. स्पर्धेला ८ दिवस असताना असे सगळे होत असून, याशिवाय माझ्या एका प्रशिक्षकाला भारतात पुन्हा पाठवण्यात आले आहे. या सगळ्यानंतर मी खेळावर कसे लक्ष देऊ हे कळत नाही. पण आशा आहे या साऱ्यानंतरही मी देशासाठी पदक मिळवून देईन”

यंदा कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games 2022) इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहेत. या भव्य स्पर्धेसाठी बॉक्सिंग खेळात भारताची ऑलिम्पिक पदकविजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) आणि बॉक्सर निखत जरीन (Nikhat Zareen) यांनी स्थान मिळवले आहे. त्यामुळे या दोघेही या स्पर्धेत भारताचे नेतृत्त्व करणार आहेत.


हेही वाचा – सामना जिंकूनही भारतीय संघाच्या आनंदावर विरजण; आयसीसीने सर्व खेळाडूंना ठोठावला दंड

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -