घरताज्या घडामोडीचीन जगासाठी ठरतोय धोकादायक, ऋषी सुनकांचा मोठा खुलासा

चीन जगासाठी ठरतोय धोकादायक, ऋषी सुनकांचा मोठा खुलासा

Subscribe

ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाची सुरू असलेली शर्यत आता चीन आणि या देशाच्या विस्तारवादी भूमिकेवर येऊन ठेपली आहे. सध्या पंतप्रधानांचे उमेदवार आणि सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या लिझ ट्रस यांनी ऋषी सुनक यांच्यावर चीनने कमकुवत भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला. परंतु यावर ऋषी सुनक यांनी सडेतोड उत्तर देत चीन जगासाठी धोकादायक ठरत असल्याचा खुलासा ऋषी सुनक यांनी केली आहे.

चीन संपूर्ण जगासाठी धोका आहे, असं स्पष्टीकरण ऋषी सुनक यांनी दिलं आहे. ज्यापद्धतीने चीनने अमेरिका आणि भारताला लक्ष्य केलं आहे. ते पाहता त्या देशाची नियत लक्षात येते. चीन तांत्रिकदृष्ट्या आपली आक्रमकपणा दाखवून देत आहे. तसेच नवनव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुसऱ्या देशांमध्ये हस्तक्षेप करणं सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

जगातील स्वतंत्र्य देशांनी आता अशी एक संघटनेची स्थापना करावी, की जी संघटना चीनच्या आक्रमकतेला रोखण्याचं काम करेल, असं ऋषी सुनक म्हणाले. चीन सध्या देशातील विद्यापीठांमध्ये घुसखोरी करतोय. तैवानसारख्या देशांना घाबरवण्याचं काम करतोय. हाँगकाँगमध्येही मानवाधिकार नियमांचं उल्लंघन केलं जातंय.चीनच्या गुप्तहेरीच्या इराद्यांना नाकाम करण्यासाठी ब्रिटनच्या स्थानिक गुप्तहेर संघटना एमआय५ चा वापर केला जाईल, असंही सुनक म्हणाले.

चीनच्या विस्तारवादी भूमिकेचा उल्लेख करत ऋषी सुनक यांनी चीन इतर देशांना कर्जाच्या ओझ्याखाली दाबून विस्तारवादी रणनितीला पुढे नेत असल्याचं देखील ते म्हणालेत. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर सर्वात आधी ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या 30 Confucius Institutes बंद करण्यात येतील. ज्यांचं संचालन चीनकडून सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मतदार ओळखपत्रांशी आधारकार्ड होणार लिंक; १ ऑगस्टपासून महाराष्ट्रातून मोहिमेला सुरुवात


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -