घरक्रीडासामना जिंकूनही भारतीय संघाच्या आनंदावर विरजण; आयसीसीने सर्व खेळाडूंना ठोठावला दंड

सामना जिंकूनही भारतीय संघाच्या आनंदावर विरजण; आयसीसीने सर्व खेळाडूंना ठोठावला दंड

Subscribe

भारतीय संघ सध्या परदेशी दौऱ्यांमध्ये व्यस्त आहे. सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वनडे मालिका सुरू आहे. या मलिकेतील दुसऱ्या सामना रविवारी झाला असुन, भारताने २ विकेट्सनी वेस्ट इंडिजचा पराभव केला.

भारतीय संघ सध्या परदेशी दौऱ्यांमध्ये व्यस्त आहे. सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वनडे मालिका सुरू आहे. या मलिकेतील दुसऱ्या सामना रविवारी झाला असुन, भारताने २ विकेट्सनी वेस्ट इंडिजचा पराभव केला. मात्र, या सामन्यात भारताने सामना जिंकला असला तरी, त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) भारतीय संघावर षटकांची गती कमी राखण्यासाठी (Slow Over Rate) भारतीय संघावर दंड ठोठावला आहे. (team india fined for slow over rate during india vs west indies 1st odi)

वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात भारताने निर्धारित वेळेपेक्षा एक षटक कमी टाकल्याचे सांगत दंड ठोठोवला. भारतीय संघावर सामना शुल्काच्या 20 टक्के दंड लावण्यात आहे. आचारसंहितेच्या नियम 2.22 नुसार भारतीय खेळाडूंना निर्धारित वेळेपक्षा एक षटक कमी टाकल्यानं सामना शुल्काच्या २० टक्के दंड लावण्यात येत असल्याची माहिती सामना रेफरी रिची रिचर्डसन यांनी दिली.

- Advertisement -

आयसीसीच्या या दंडानंतर भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या शिखर धवनने आपली चूक मान्य केली. ज्यामुळं कोणताही अधिक कारवाई करण्याची गरज भासली नाही. दरम्यान, पहिल्या वनडे सामन्यातील पंच जोए विलसन आणि लेसली रीफर, तिसरे पंच ग्रेगरी ब्रेथवेट व चौथे पंच नायजेल डुगुइड यांनी भारतीय संघावर षटकांची गती कमी राखण्याचा आरोप केला होता.

दरम्यान, रविवारी संध्याकाळी त्रिनिदादच्या (Trinidad) क्वीन्स पार्क ओव्हल (Queen’s Park Oval) स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा वनडे सामना झाला. या सामन्यातील विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिका खिशात घातली आहे.

- Advertisement -

वेस्ट इंडिजच्या मायभूमीवर भारताला विजय मिळवून देणारे माजी कर्णधार

  • माजी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक दोनवेळा वनडे मालिका जिंकली आहे.
  • माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारताने पहिल्यांदाच वनडे मालिकेत वेस्ट इंडीजच्या संघाला त्यांच्याच मायभूमीवर नमवले होते.
  • भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं विजयाचा क्रम पुढे नेला. धोनीच्या नेतृत्वात भारताला वेस्ट इंडिजमध्ये केवळ एकदाच एकदिवसीय मालिका जिंकली.
  • सुरेश रैनानंही एकदा वेस्ट इंडीजच्या भूमीवर एकदिवसीय मालिकेत भारताल विजय मिळवून दिला होता.
  • भारताचा सलामीवीर शिखर धवनेही वेस्ट इंडिजच्या भूमीवर भारताला विजय मिळवून दिला.

हेही वाचा – जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राला सिल्वर मेडल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -