घरक्रीडादुखापती टाळण्यासाठी ठराविक सामनेच खेळणार - दीपक चहर

दुखापती टाळण्यासाठी ठराविक सामनेच खेळणार – दीपक चहर

Subscribe

भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने मागील काही काळात एकदिवसीय आणि खासकरुन टी-२० अप्रतिम कामगिरी केली आहे. चहरने १० टी-२० सामन्यांत १५ च्या सरासरीने १७ गडी बाद केले आहेत. काही महिन्यांपूर्वी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या ७ धावांत ६ मोहरे टिपत भारताला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे त्याला नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही संधी मिळाली. मात्र, या मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात त्याच्या पाठीला दुखापत झाली. त्यामुळे त्याला पुढील काही महिने मैदानाबाहेर रहावे लागणार आहे. आता यापुढे दुखापती टाळण्यासाठी त्याने ठराविक सामनेच खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

माझ्या पाठीला दुखापत झाली, कारण मागील काही काळात मी खूप जास्त सामने खेळलो. रणजी करंडक सुरु होण्याआधी मी जवळपास सर्वच सामने खेळलो होतो. आता पुढील काळात दुखापती टाळण्यासाठी मी ठराविकच सामने खेळण्याचा निर्णय घेतला आहे. दुखापतीमुळे माझी नवीन वर्षाची चांगली सुरुवात झाली नाही. मात्र, लवकर फिट होऊन उत्तम कामगिरी करत राहण्याचे माझे लक्ष्य आहे. सातत्याने सामने खेळल्यामुळे माझ्या गोलंदाजीचा वेगही कमी झाला आहे. त्यामुळे वेग वाढवण्यासाठी मी अधिक सराव करणार आहे, असे चहरने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -