घरमहाराष्ट्रतेलाचा टँकर उलटून विचित्र अपघात

तेलाचा टँकर उलटून विचित्र अपघात

Subscribe

पुणे-बंगळुरु महामार्गावर बुधवारी पहाटे तेलाचा टँकर उलटला. सातार्‍यातील शेंद्रे गावच्या हद्दीत हा अपघात झाला. तेलाची वाहतूक करणारा हा अपघातग्रस्त टँकर रस्ता सोडून विरुद्ध दिशेला जाऊन मोटारीवर आदळून उलटला. यामुळे महामार्गावर तेल गळती झाली होती. या अपघातात मोटारीचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बुधवारी पहाटेच्या सुमारास पुणे-बंगळुरु महामार्गावर शेंद्रे गावाच्या हद्दीत कोल्हापूरकडे जाणारा तेलाचा टँकर आपली मार्गिका सोडून विरूद्ध बाजूला मोटारीवर जाऊन आदळला आणि उलटला. यामुळे रस्त्यावर तेल सांडले होते. अपघातामुळे काही वेळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ही माहिती महामार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. सातारा तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -