घरक्रीडासरस्वती स्पोर्ट्स क्लब अजिंक्य

सरस्वती स्पोर्ट्स क्लब अजिंक्य

Subscribe

चिंतामणी चषक खो-खो

सरस्वती स्पोर्ट्स क्लबने पुरुषांमध्ये, तर शिवनेरी सेवा मंडळाने महिलांमध्ये चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ आयोजित चिंतामणी चषक खो-खो स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. पुरुषांत सरस्वतीचा श्रेयस राऊळ आणि महिलांमध्ये शिवेनरीची अक्षया गावडेने सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू ठरली.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात माहिमच्या सरस्वती स्पोर्ट्स क्लबने दादरच्या गतविजेत्या ओम समर्थ भारत व्यायाममंदिरावर १४-१३ अशी मात केली. सरस्वतीच्या विजयात श्रेयस राऊळ (१:४०, १:२० मिनिटे संरक्षण आणि ४ बळी), निखिल कांबळे (१:०० मिनिटे संरक्षण आणि ४ बळी) हे खेळाडू चमकले. महिलांच्या अंतिम सामन्यात दादरच्या शिवनेरी सेवा मंडळने दादरच्याच अमर हिंद मंडळावर १०-६ असा एक डाव चार गुणांनी विजय मिळवला. शिवनेरीकडून अक्षया गावडेने ३:३० आणि नाबाद १:५० मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात तीन खेळाडूही बाद केले.

- Advertisement -

विद्यार्थी क्रीडा केंद्र विजयी
ज्युनियर मुलांमध्ये विद्यार्थी क्रीडा केंद्राने जेतेपद मिळवताना अंतिम सामन्यात दादरच्या श्री समर्थ व्यायाममंदिराचा १५-१३ असा पराभव केला. मुलींच्या अंतिम सामन्यात शिवनेरी सेवा मंडळाने ओम साईश्वर सेवा मंडळावर मात केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -