घरक्रीडाBWF World Tour Finals : फायनलमध्ये पी.व्ही सिंधू चितपट; दक्षिण कोरियाच्या सेयुंगने...

BWF World Tour Finals : फायनलमध्ये पी.व्ही सिंधू चितपट; दक्षिण कोरियाच्या सेयुंगने फक्त ३९ मिनिटांत केला पराभव

Subscribe

बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायलनलच्या अंतिम फेरीत भारताच्या पी.व्ही सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला

बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायलनल्सच्या अंतिम फेरीत भारताच्या पी.व्ही सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण कोरियाच्या सेयुंगने सिंधूचा सरळ सेटमध्ये पराभव केला. केवळ ३९ मिनिटे चाललेल्या सामन्यात सिंधूला तिची लय पकडता आली नाही बदल्यात २१-१६, २१-१२ अशा मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले. सामन्याच्या सुरूवातीपासूनच सेयुंगने शानदार प्रदर्शन केले आणि सिंधूला सामन्यात लय पकडण्याची संधीच दिली नाही. दक्षिण कोरियाच्या खेळाडूने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आणि ही आघाडी सिंधूला कमी करता आली नाही. तिला सामन्यात सेयुंगवर कधीच दबाव आणता आला नाही.

सिंधूने मागील कित्येक स्पर्धांमध्ये अंतिम आणि उपांत्यफेरी गाठली आहे. मात्र किताब जिंकू शकली नाही. या स्पर्धेत देखील तिच्या बाबतीत असच काहीसे झाले आहे. तिला तिच्या खेळात आणि मानसिकतेत बदल करायला हवा आणि मोठ्या सामन्यात येणाऱ्या दबावापासून वाचायला हवे. सिंधूने नेहमीच ग्रुप स्टेजच्या सामन्यात चांगले प्रदर्शन केले आहे. पण नॉक आउट सामन्यात दबावात आलेली पहायला मिळते. दोन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन राहिलेल्या सिंधूला तिच्या कमजोरीवर काम करण्याची गरज आहे.

- Advertisement -

उपांत्यफेरीत जपानच्या खेळाडूला केले होते चितपट

बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायलनलच्या स्पर्धेच्या उपांत्यफेरीत सिंधूने जपानच्या यामागूचीचा २१-१५, १५-२१, २१-१९ अशा फरकाने पराभव केला होता. संघर्षमय सामन्यात सिंधूने पहिल्या सेटमध्ये विजय मिळवला होता. मात्र दुसऱ्या सेटमध्ये तिला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये मोठा संघर्ष झाला. करो या मरोच्या तिसऱ्या सेटमध्ये सिंधूने २१-१९ असा विजय मिळवून अंतिम फेरीचे तिकिट मिळवले होते.


हे ही वाचा: http://State level taekwondo competition : पुणे १०९ गुणांसह विजेतेपदाचा मानकरी; मुंबईचा संघ उपविजेता, सांगलीचा तिसरा क्रमांक

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -