घरक्रीडाभारतीय संघाला धक्का; दुखापतीमुळे रवींद्र जडेजा संघाबाहेर

भारतीय संघाला धक्का; दुखापतीमुळे रवींद्र जडेजा संघाबाहेर

Subscribe

भारतीय संघाने पाकिस्तानाचा पराभव करत आशिया चषकात पहिला सामना विजय मिळवला. मात्र, आता आशिया चषकात सुपर 4 च्या सामन्यांपूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला दुखापत झाली आहे.

भारतीय संघाने पाकिस्तानाचा पराभव करत आशिया चषकात पहिला सामना विजय मिळवला. मात्र, आता आशिया चषकात सुपर 4 च्या सामन्यांपूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला दुखापत झाली आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेतून रविद्र जडेजाला बाहेर पडवे लागले आहे.

यासंदर्भात बीसीसीआयने ट्वीट करत माहिती दिली आहे. जडेजाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 35 धावांची खेळी केली होती. दरम्यान, रवींद्र जडेजाच्या जागी आता भारतीय संघात अक्षर पटेल याला भारतीय संघात स्थान देण्यात आला आहे. आशिय चषकासाठी अक्षर पटेलला अतिरिक्त खेळाडून म्हणून स्थान देण्यात आले होते. लवकरच अक्षर पटेल दुबईसाठी रवाना होणार आहे.

- Advertisement -

आशिया चषकाच्या पहिल्या सामन्या जडेजाने 2 षटकांत 11 धावा दिल्या 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. आशिया चषकात रवींद्र जडेजा जबरदस्त फॉर्ममध्ये होता. अष्टपैलू हार्दिक पांड्यासोबत अर्धशतकी भागीदारी केली होती. तसेच, हाँगकाँग संघाच्या विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही जडेजाने 4 षटकात केवळ 15 धावा देत 1 विकेट घेतली होती.

भारतीय संघ

- Advertisement -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.


हेही वाचा – विराट कोहली अलिबागमध्ये 8 एकर जमिनीवर उभारणार फार्महाऊस

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -