घरगणेशोत्सव 2022कृत्रिम तलावांत गतवर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तींच्या संख्येत १९८ ने घट

कृत्रिम तलावांत गतवर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तींच्या संख्येत १९८ ने घट

Subscribe

मुंबईत कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने सरकारने निर्बंध हटवले. या संधीचा फायदा घेत मुंबईत मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. विघ्नहर्ता श्रीगणेशाचे धुमधडाक्यात आगमन झाल्यानंतर दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे उत्साहात व भावपूर्ण वातावरणात शुक्रवारी सकाळपर्यंत ७३ नैसर्गिक व १५२ कृत्रिम तलाव विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात आले.

मुंबईत कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने सरकारने निर्बंध हटवले. या संधीचा फायदा घेत मुंबईत मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. विघ्नहर्ता श्रीगणेशाचे धुमधडाक्यात आगमन झाल्यानंतर दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे उत्साहात व भावपूर्ण वातावरणात शुक्रवारी सकाळपर्यंत ७३ नैसर्गिक व १५२ कृत्रिम तलाव विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गणेशमूर्तींच्या संख्येत तब्बल ११,७०८ ने वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. तर पालिकेने यंदा कृत्रिम तलावांची संख्या १७३ वरून कमी करून १५२ एवढी केल्यानंतर विसर्जनावर काहीसा परिणाम झाला आहे. (Compared to last year the number of idols in artificial ponds has decreased by 198 this year)

गतवर्षीच्या तुलनेत यंदा गणेशमूर्तींच्या संख्येत १९८ ने घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. कृत्रिम तलावांत गतवर्षीच्या तुलनेत सार्वजनिक गणेशमूर्तींच्या संख्येत १११ ने व घरगुती मूर्तींच्या संख्येत ७७ ने घट झाली आहे.एकूण गणेश विसर्जनामध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा सार्वजनिक गणेशमूर्तींच्या संख्येत १५१ ने घट झाली आहे. तर गतवर्षीच्या तुलनेत यंदा घरगुती गणेशमूर्तींच्या संख्येत तब्बल ११,८५९ ने वाढ झाली आहे.

- Advertisement -

मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. दोन वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने व महापालिकेने त्यावेळी कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी काही कडक निर्बंध घातले होते. त्यामुळे त्याचा फटका मुंबईकरांच्या नोकरी, रोजगारावर झाला होता. अनेक कंपन्या बंद पडून लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. लोक बेरोजगार झाले. त्यात सरकारने सण, उत्सव साजरे करण्यावर कडक निर्बंध लावले होते. मात्र तरीही गणपती बाप्पावर खरी श्रद्धा असणाऱ्या लाखो गणेश भक्तांनी कोरोना नियमांचे पालन करून आपल्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. मात्र दोन वर्षे अथक प्रयत्न करून सरकार व पालिका आरोग्य यंत्रणेने कोरोनावर यंदा काहीसे नियंत्रण मिळविले. त्यामुळे यंदा गणेशोत्सव जल्लोषात व उत्साहात साजरा करण्यात आला. परिणामी यंदा दीड दिवसांच्या गणेशमूर्तींच्या संख्येत तब्बल ११,७०८ ने वाढ झाली.

यंदा गणेशोत्सवात ७३ नैसर्गिक व १५२ कृत्रिम तलाव विसर्जन स्थळी एकूण २८४ सार्वजनिक गणेशमूर्तींचे व ६०,१२२ घरगुती गणेशमूर्तींचे असे एकूण ६०,४०६ गणेशमूर्तींचे आणि ६७ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये, कृत्रिम तलावांतील १७२ सार्वजनिक गणेशमूर्तींचा व २४,१९६ घरगुती अशा एकूण २४,३६८ गणेशमूर्तीचा समावेश आहे. तर १४ हरतालिकांचा समावेश आहे.

- Advertisement -

गतवर्षीच्या गणेशोत्सवात ७३ नैसर्गिक व १७३ कृत्रिम तलाव विसर्जन स्थळी एकूण ४३५ सार्वजनिक गणेशमूर्तींचे व ४८,२६३ घरगुती गणेशमूर्तींचे असे एकूण ४८,६९८ गणेशमूर्तींचे आणि १८ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये, कृत्रिम तलावांतील २८३ सार्वजनिक गणेशमूर्तींचा व २४,२७३ घरगुती अशा एकूण २४,५५६ गणेशमूर्तीचा समावेश आहे. तर १५ हरतालिकांचा समावेश होता.


हेही वाचा – Gauri ganpati 2022 : गौरी गणपतीची आई की बहीण? जाणून घ्या खरं उत्तर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -