घरक्रीडाविराट कोहली अलिबागमध्ये 8 एकर जमिनीवर उभारणार फार्महाऊस

विराट कोहली अलिबागमध्ये 8 एकर जमिनीवर उभारणार फार्महाऊस

Subscribe

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि रन मशीन विराट कोहली लवकरच अलिबागकर होणार आहे. विराट कोहलीने अलिबागमधील झिराड परिसरात जमीन खरेदी केली आहे. 8 एकर ही जमीन असून याठिकाणी कोहली फार्महाऊस बांधणार आहे.

अलिबाग : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि रन मशीन विराट कोहली लवकरच अलिबागकर होणार आहे. विराट कोहलीने अलिबागमधील झिराड परिसरात जमीन खरेदी केली आहे. 8 एकर ही जमीन असून याठिकाणी कोहली फार्महाऊस बांधणार आहे. विराटच्या या फॉर्महाऊसबाबतचा व्यवहार त्याचा भाऊ विकास कोहली याने केला. गणरायाचा आगमनाच्या आदल्या दिवशी हा व्यवहार केल्याची माहिती समोर येत आहे. 6 महिन्यांपूर्वी विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा यांनी झिराड येथील जागेची पाहणी केली होती. (Virat Kohli will build a farmhouse on 8 acres of land in Alibaug)

भारतीय संघ सध्या आशिया चषकात व्यस्त असून विराट कोहलीही चांगली कामगिरी करत आहे. सध्या तो आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी दुबईत आहे. तसेच, क्रिकेटच्या व्यस्त कार्यक्रमामुळे विराट कोहलीला अलिबागमध्ये येऊन जागेचा व्यवहार पूर्ण करता येत नव्हता. त्यामुळे गणपतीचा आदल्या दिवसाचा मुहूर्त साधत लहान भाऊ विकास कोहली याने ‘पॉवर ऑफ अटर्नी’द्वारे विराट कोहलीसाठी व्यवहार पूर्ण केला.

- Advertisement -

8 एकर जमीन खरेदी-विक्रीची कागदपत्रे अलिबाग येथील सह दुय्यम निबंधक अश्विनी भगत यांच्याकडे नोंदणीकृत केली. या जमिनीची एकूण किंमत 19 कोटी 24 लाख 50 हजार रुपये असून यासाठी त्याने 3 लाख 35 हजार रेडीरेकनरनुसार 1 कोटी 15 लाख 45 हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटी सरकारच्या तिजोरीत जमा केली. मंगळवारी विकास कोहलीने निबंधक कार्यालयात उपस्थित राहून हा व्यवहार रजिस्टर केला. हा व्यवहार रियल इस्टेटमधील नावाजलेल्या समिरा हॅबिटॅट्स या कंपनीने केला.

या व्यवहारानंतर रवी शास्त्री, रोहीत शर्मा यांच्या पाठोपाठ आता विराट कोहलीही अलिबागकर होणार आहे. उद्योजक, सिने कलाकारांबरोबरच क्रिकेटपटूंनाही अलिबागच्या निसर्गरम्य परिसराची भूरळ पडत आहे. रवी शास्त्री याने दहा वर्षांपूर्वीच अलिबागमध्ये घर बांधले आहे, तर म्हात्रोळी-सारळ परिसरात रोहीत शर्मा याच्या 3 एकरमधील फार्महाऊसचे काम चालू असल्याची माहिती या फार्महाऊसचे बांधकाम करणारे अमित नाईक यांनी दिली.

- Advertisement -

याव्यतिरिक्त हार्दिक पांड्या, युजवेंदर चहल हेदेखील काही दिवसांपासून जागेचा शोध घेत अलिबागमध्ये पोहचले होते. यावरुन क्रिकेट, सिनेकलाकार, उद्योजकांची अलिबागला असणारी पसंती दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.


हेही वाचा – मुंबादेवी परिसरात बॅनर लावण्यावरून मनसे कार्यकर्त्यांची महिलेला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -