घरक्रीडाRCB Vs KKR : कोहलीची खेळी वाया; कोलकाताचा बंगळुरूवर 7 गडी राखून...

RCB Vs KKR : कोहलीची खेळी वाया; कोलकाताचा बंगळुरूवर 7 गडी राखून विजय

Subscribe

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 17 व्या पर्वातील 10 सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. या सामन्यात कोलकाताने 7 गडी राखून बंगळुरूवर विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली याने तफानी खेळी केल्याने बंगळुरूने 182 धावांचे लक्ष्य कोलकातासमोर ठेवले.

बंगळुरु : इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 17 व्या पर्वातील 10 सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. या सामन्यात कोलकाताने 7 गडी राखून बंगळुरूवर विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली याने तफानी खेळी केल्याने बंगळुरूने 182 धावांचे लक्ष्य कोलकातासमोर ठेवले. विराटने या सामन्यात 83 धावांची खेळी केली. मात्र, बंगळुरूने दिलेल्या 182 धावांचा पाठलाग करताना कोलकाताने केवळ 16.5 षटकांत 3 गडी गमावून सहज लक्ष्य गाठले. (rcb vs kkr kkr become the first team to register an away win ipl 2024)

आयपीएलचे आतापर्यंत झालेल्या 10 सामन्यांपैकी 9 सामने घरच्या मैदानावर झाले असून प्रत्येक संघाने घरच्या मैदानावर खेळताना विजय मिळवला. पण 10व्या सामन्यात बदल पाहायला मिळाला कोलकाताने बंगळुरूविरुद्ध झालेल्या 10 व्या सामन्यात बंगळुरूला त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजेच एम. चिन्नास्वामी मैदानावर पराभव केला. बंगळुरूचे आतापर्यंत तीन सामने झाले असून यापैकी दोन सामने बंगळुरूने गमावले असून एका सामन्यात विजय मिळवला आहे.

- Advertisement -

बंगळुरूने दिलेल्या 182 धावांचा पाठलाग करताना कोलकाताच्या फलांदाजांनी तुफानी फलंदीजी केली. फिल सॉल्टने 20 चेंडूत 30 धावा, सुनील नरेनने 22 चेंडूत 47 धावा, व्यंकटेश अय्यरने 30 चेंडूत 50 धावा आणि श्रेयस अय्यरने 24 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या. विशेष म्हणदे व्यंकटेश अय्यर याने अवघ्या 29 चेंडूत अर्धशतक झळकावले. व्यंकटेश अय्यर याने 30 चेंडूत 50 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 4 षटकार आणि 3 चौकार लगावले.

कोहली अणि गंभीरची भेट

सध्या आयपीएलचे 17 वे पर्व सुरू असून मागील 16 पर्वात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी वादाची ठिणगी उडताना पाहायला मिळायची. पण कालच्या सामन्यात दोघांमधील मैत्रीपूर्ण संबंध पाहायला मिळाले. टाइम आऊट दरम्यान गंभीर मैदानावर आला आणि येताच त्याने सर्वप्रथम कोहलीची भेट घेतली आणि त्याला मिठी मारली. या सुंदर क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2024: RR vs DC सामन्यात ऋषभ पंतचा संयम सुटला, रागात भिंतीवर आदळली बॅट; व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -