घरक्रीडाही रोहितची सर्वोत्तम खेळी!

ही रोहितची सर्वोत्तम खेळी!

Subscribe

 कर्णधार कोहलीची स्तुती

दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकाची विजयी सुरुवात केली. या सामन्यात द.आफ्रिकेने दिलेल्या २२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने दोन विकेट लवकर गमावल्या. मात्र, उपकर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माने १४४ चेंडूत नाबाद १२२ धावांची अप्रतिम खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. याआधी एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन वेळा दुहेरी शतक करणार्‍या रोहितची ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी होती, अशा शब्दांत सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने रोहितच्या खेळीची स्तुती केली.

माझ्या मते ही रोहितची त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी होती, कारण हा आमचा या विश्वचषकातील पहिलाच सामना होता. विश्वचषकात पहिला सामना खेळताना संघावर प्रचंड दबाव असतो. फलंदाज म्हणून जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर जाता आणि पहिले काही चेंडू जास्त उसळी घेतात, तेव्हा लक्ष केंद्रित करून फलंदाजी करणे अवघड होते. बर्‍याचदा फलंदाज अशा परिस्थितीत मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र, रोहितने खूप संयमाने फलंदाजी केली. त्याने आता बरेच सामने खेळले आहेत आणि त्यामुळे त्याच्यासारख्या खेळाडूकडून आम्हाला असेच जबाबदारीने खेळणे अपेक्षित आहे. याआधी मी त्याच्या खूप अविस्मरणीय खेळी पाहिल्या आहेत. मात्र, त्याची ही खेळी सर्वोत्तम होती, कारण तो खूप संयमाने खेळला. या खेळीदरम्यान तो खराब फटका मारून बाद होईल, असे आम्हाला आणि त्यालाही वाटले नाही, हे या खेळीचे वैशिष्ठ्य होते, असे कोहली म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -