घरक्रीडासचिन तेंडुलकरचे हे स्वप्न देखील झाले पूर्ण

सचिन तेंडुलकरचे हे स्वप्न देखील झाले पूर्ण

Subscribe

भारतीय क्रिकेट चाहत्यांचा अतिशय लाडका क्रिकेटपटू, माजी खासदार, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे आणखी एक स्वप्न पूर्ण झाले आहे. सचिन तेंडुलकरचे क्रिकेटसहीत गाड्यांवरही प्रेम आहे. विशेषतः त्याचे फेरारी प्रेम हे काही नव्याने सांगायला नको. सचिनकडे एकेकाळी फेरारी कार होती, सचिन रात्री उशीरा मुंबईच्या मोकळ्या रस्त्यांवर फेरारीचा फेरफटका मारायचा, असे त्याचे जवळचे मित्र सांगायचे.

मात्र गाड्याबद्दलचे त्याचे आणखी एक स्वप्न आता पूर्ण झाले आहे. फॉर्म्युला वन कार चालवण्याचे स्वप्न सचिन बऱ्याच वर्षांपासून बाळगून होता. सचिनला एकादाची ही संधी मिळाली. या कार रेसिंगचा थरार सचिनने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

- Advertisement -

अपोलो टायर्सच्या एका व्यावसायिक उपक्रमासाठी सचिन तेंडुलकरला फॉर्म्युला वन कार चालवण्याची संधी मिळाली. चेकोस्लोवाकिया या देशात सचिनने हा फॉर्म्युला वन कार चालवण्याचा आनंद लुटला. या बाबातचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करून सचिन म्हणाला की, “फॉर्म्युला वन कार चालवण्यासाठी मी अधिर झालो होतो. अपोलो टायर्सच्या एका कार्यक्रमासाठी ही संधी मला चालून आली. ही कार चालवण्याचा अनुभव अफलातून होता.”

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये सचिन भलताच आनंदी दिसत आहे. फॉर्म्युला वन कार चालकासाठी लागणारा सुट त्याने परिधान केला होता. तर ही कार कशी चालवायची याबाबतच्या सूचना देखील त्याने काळजीपूर्वक ऐकल्याचे दिसत आहे. त्यानंतर त्याने मोकळ्या ट्रॅकवर भरधाव वेगाने फॉर्म्युला वन कार चालवण्याचा मनमुराद आनंद लुटला. सचिनच्या कारचा वेग नेमका किती होता, याबाबत अजून माहिती मिळालेली नसली. तरी सचिन अतिशय नियंत्रणात ही कार चालवताना दिसत आहे, जसे की तो आपल्या शैलीत स्ट्रेट ड्राईव्ह मारतोय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -