घरक्रीडासय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी; सत्यजित बच्छाव महाराष्ट्र संघात

सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी; सत्यजित बच्छाव महाराष्ट्र संघात

Subscribe

महाराष्ट्राने या स्पर्धेत पटकावले उपविजेतेपद

नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव या वर्षी देखील महाराष्ट्र संघातर्फे सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी (T-20) स्पर्धेकरिता निवडण्यात आला आहे.भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयतर्फे टी-ट्वेंटी सामन्यांची स्पर्धा सय्यद मुश्ताक अली चषक आयोजित करण्यात येते.

 २०१८-२०१९  ह्या वर्षी या स्पर्धेत सत्यजित बच्छाव याने सर्वाधिक बळी मिळवत महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत नेण्यासाठी मोठा हातभार लावला होता व महाराष्ट्राने या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सत्यजित हा महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज झालेला आहे. आयपीएल उत्कृष्ठ फलंदाज ऋतुराज गायकवाड च्या नेतृत्वा खाली महाराष्ट्र संघात सत्यजित ची निवड झाली आहे. या स्पर्धेतून आयपीएल स्पर्धेत खेळण्याची संधी उपलब्ध होते. मागील तीन वर्षांपासून मुश्ताक अली स्पर्धेत सत्यजित सातत्याने उत्कृष्ठ कामगिरी करत असल्याने आयपीएल च्या लिलाव प्रक्रियेत त्याचा समावेश झालेला होता.

- Advertisement -

सत्यजितच्या महाराष्ट्र संघातील या निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्हा संघात, तसेच जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्यजितचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी -T-20 – स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा चमु 

ऋतुराज गायकवाड – कर्णधार, नौशाद शेख – उप कर्णधार, केदार जाधव, अजीम काझी, सत्यजित बच्छाव, शामशुझमा काझी, तरणजीत सिंग धील्लों, सुनिल यादव , रणजीत निकम , दिव्यांग हिंगणेकर,जगदीश झोपे , स्वप्नील फुलपगार , प्रदीप दाढे, मनोज इंगळे ,मुकेश चौधरी , पवन शाह , स्वप्निल गुगळे,धीरज परदेशी , आशय पालकर.

लखनौला एलिट ए गटातील महाराष्ट्राचे सामने पुढीलप्रमाणे होणार आहेत :

  • ४ नोव्हेंबर – तमिळनाडू
  • ५ नोव्हेंबर – पंजाब
  • ६ नोव्हेंबर  ओडिशा,
  • ८ नोव्हेंबर – पुदुचेरी,
  • ९ नोव्हेंबर – गोवा .
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -