घरताज्या घडामोडीDrugs Case: अनन्या पांडेनंतर 'या' तीन स्टारकिड्सची होऊ शकते NCB चौकशी

Drugs Case: अनन्या पांडेनंतर ‘या’ तीन स्टारकिड्सची होऊ शकते NCB चौकशी

Subscribe

क्रझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटमुळे आणखीन तीन स्टारकिड्स एनसीबीच्या रडारवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटमुळे बॉलिवूडमधील नवोदित अभिनेत्री अनन्या पांडे हिचे नाव समोर आले होते. त्यामुळे अनन्या पांडेची एनसीबीने दोन वेळा चौकशी केली असून लवकरच पुन्हा एकदा चौकशीसाठी अनन्याला बोलावले जाणार आहे. पण यादरम्यान आर्यन खान आणि अनन्याचे आणखीन व्हॉट्सअॅप चॅट समोर आले आहेत.

आर्यन आणि अनन्याच्या व्हॉट्सअॅप चॅटचे नवे स्क्रीनशॉट्स आज समोर आले. ज्यामध्ये एका ग्रुप चॅटचा स्क्रीनशॉट देखील आहे. यामध्ये कोकेनचा उल्लेख केला असून आर्यनने एनसीबीचा धाक दाखवून मित्रांना घाबरवल्याचे उघड झाले आहे. तसेच आर्यनच्या या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये अचित कुमार नावाच्या व्यक्तीसोबत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज खरेदी करण्यासंदर्भातील बातचित झाली आहे. अचित कुमारकडून ८० हजार रुपयांच्या ड्रग्ज मागणी आर्यन केली होती.

- Advertisement -

आर्यन खानच्या जप्त केलेल्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप डेटामध्ये आणखीन दोन जणांसोबत ड्रग्जवर ग्रपुमध्ये बातचित केल्याचे समोर आले आहे. एनसीबीला अनन्या पांडे व्यतिरिक्त तीन इतर सेलिब्रिटी किड्ससोबत आर्यनचे चॅट हाती लागले आहे. तसेच काही ड्रग्ज पेडलर आपले जाळे वाढवून बॉलिवूड आणि ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे एनसीबी समजल्याची माहिती मिळाली आहे. सध्या एनसीबी अनन्या पांडेची पुरवठादार म्हणून चौकशी करत आहे. पण आता यापुढे आणखीन कोणत्या सेलिब्रिटी किड्सची नाव समोर येतील? हे पाहणे महत्त्वाचे असेल.


हेही वाचा – आर्यनचा जामीन शाहरुख खानला वाटतोय कठीण, मन्नतवरील स्थिती मित्राकडून शेअर


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -