घरक्रीडाश्रीराम, जय दत्तगुरुची आगेकूच

श्रीराम, जय दत्तगुरुची आगेकूच

Subscribe

श्रीराम संघ, जय दत्तगुरु, सह्याद्री मित्र मंडळ या संघानी प्रभादेवी येथे सुरू असलेल्या स्वप्नसाफल्य चषक ज्युनियर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये आगेकूच केली आहे. अ गटात उपनगरच्या सह्याद्री मित्र मंडळाने ठाण्याच्या शिवशंकरचा २९-२४ असा पराभव करत बाद फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या. पहिल्या साखळी सामन्यात झालेल्या पराभवामुळे त्यांना या सामन्यात विजयी होणे गरजेचे होते. मध्यांतराला १४-०९ अशी आघाडी घेणार्‍या सह्याद्रीने उत्तरार्धात संयमाने खेळ करत हा सामना जिंकला. भरत कलगुटकर, प्रणय रुपये सह्याद्रीकडून, तर साहिल गायकवाड, सुमित नेंनवाल शिव शंकरकडून उत्कृष्ट खेळले.

क गटात पालघरच्या श्रीराम संघाने ठाण्याच्या ग्रिफिन जिमखान्याचा ३८-१४ असा सहज पराभव केला. मध्यांतराला २१-०२ अशी भक्कम आघाडी घेणार्‍या श्रीराम संघाकडून अविनाश पालवे, प्रशांत खेडेकर यांनी चमकदार खेळ केला. ग्रिफिनच्या या सलग दुसर्‍या पराभवामुळे त्यांच्यावर साखळीतच गारद होण्याची वेळ आली. ब गटात एस. एस. जी फाऊंडेशनने आणि विकास मंडळ या दोन मुंबईच्या संघांमध्ये लढत झाली. हा सामना एस. एस. जीने ६३-३८ असा मोठ्या फरकाने जिंकला.

- Advertisement -

या सामन्याच्या मध्यांतराला एस. एस. जीकडे २७-१७ अशी आघाडी होती. उदयोन्मुख खेळाडू पंकज मोहिते, ओमकार साजेकर एस. एस. जीच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. क गटातील सामन्यात जय दत्तगुरुने बलाढ्य विजय क्लबला ५१-२१ असे नमवले. या पराभवामुळे विजय क्लबचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. दत्तगुरुकडे मध्यांतराला ३४-११ अशी मोठी आघाडी होती. सिद्धार्थ बोरकर, रुपेश बोरकर दत्तगुरुच्या या विजयात चमकले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -