घरक्रीडाU-19 World Cup 2022 : क्रिकेटची आवड असणाऱ्या वडिलांचे स्वप्न मुलाकडून पूर्ण;...

U-19 World Cup 2022 : क्रिकेटची आवड असणाऱ्या वडिलांचे स्वप्न मुलाकडून पूर्ण; आता थेट भारतासाठी खेळणार

Subscribe

१९ वर्षाखालील विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दरम्यान १७ खेळाडूंची या अंडर-१९ विश्वचषकासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये गाजियाबादमधील सिद्धार्थ यादव याला टीममध्ये निवड होण्याच्या त्याच्या प्रयत्नांना पुरेपुर यश मिळाले आहे. सिध्दार्थचे वडील श्रवण यादव यांचे गाजियाबादमध्ये किराणा मालाचे छोटे दुकान आहे. जे सिध्दार्थचे अंडर-१९ विश्वचषकात सिलेक्शन झाल्यानंतर चांगलेच चर्चेत आहे.दुकानात येणारे-जाणारे ग्राहक शुभेच्छा देत आहेत. सिद्धार्थचे वडील ‘श्रवण यादव’ यांना क्रिकेटची बालपणापासून आवड होती मात्र, परिस्थितीसमोर त्यांना झुकावे लागले.दुकानदार श्रवण यांचे क्रिकेटरचे स्वप्न अधुरे राहिले असून, ते त्यांचे स्वप्न त्यांच्या मुलाने थेट भारतासाठी खेळून पूर्ण करणार आहे.

श्रवण यादव यांनी सांगितले की, जेव्हा सिध्दार्थ छोटा होता तेव्हा त्यांचे स्वप्न होते की, आपल्याला परिस्थितीमुळे क्रिकेटर होण्याचे स्वप्न अधुरं राहिलं ,माझ्या अधुऱ्या स्वप्नांना भरारी देण्याचे काम सिद्धार्थ नक्की करेल.सिध्दार्थच्या क्रिकेटर होण्याच्या स्वप्नांनी पंख फडफडण्याचे काम तो आठ वर्षांचा असतानाच केले.

- Advertisement -

सिध्दार्थने आपल्या वडीलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. दररोज दुपारच्या वेळेस सिद्धार्थ  सरावात कुठेही कमी पडू नये यासाठी,त्याला दररोज त्याचे वडील दुपारी दुकान बंद करुन आवर्जुन मैदानात घेऊन जायचे.दुपारी २ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ते दुकान बंद करुन त्याच्या स्वप्नांना भरारी देण्यासाठी सराव करुन घेत.त्यानंतर पुन्हा संध्याकाळी ते त्यांचे दुकान सुरु करायचे.

त्यानंतर रात्री १०:३० वाजता जेवण करुन झोपायचे.सिद्धार्थच्या वडीलांनी असे सांगितले की,या सर्व गडबडीमध्ये मी इतका थकून जातो की,त्याचे भानच राहत नाही.सिद्धार्थचे अर्थात माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण कुटूंबाचा विरोध होता कोणीच यासाठी सपोर्ट करत नव्हते. त्याच्या बहीणाला त्याने शिकावे आणि मोठे व्हावे, यासाठी त्याने आपल्या अभ्यासावर लक्ष देणे गरजेचे आहे.घरच्यांना क्रिकेट खेळणे हे एका जुगाराप्रमाणे वाटत होते.त्यामुळे त्याचे आयुष्य उद्धवस्त होईल.मात्र काहीही झाले तरी, सिद्धार्थचे स्वप्न पुर्ण करायचे असा अट्टाहास श्रवण यांनी धरला आणि त्यांचे स्वप्न अखेर पूर्ण होत आहे.

- Advertisement -

 

या १९ वर्षांखालील विश्वचषकाचे कर्णधारपद भारतीय संघाचे यश धूल यांच्याकडे देण्यात आली आहे.आशिया चषक स्पर्धेसाठीही संघाचा कर्णधार म्हणून यशची निवड करण्यात आली.या विश्वचषकाचे आयोजन १७ जानेवारीपासून वेस्ट इंडिजमध्ये करण्यात येणार आहे.यापूर्वी या अंडर-१९ विश्वचषकाचे आयोजन हे २०२० मध्ये आफ्रिकेमध्ये करण्यात आले होते.


हे ही वाचा – U-19 World Cup 2022 : आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; यश धूल करणार नेतृत्व


 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -