घरताज्या घडामोडीWinter Assembly session: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यास भाजप उमेदवार देणार का?,...

Winter Assembly session: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यास भाजप उमेदवार देणार का?, देवेंद्र फडणवीस म्हणतात…

Subscribe

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबरपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होत आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचं महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत. ही निवडणूक झाली तर भाजप उमेदवार देणार आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खासगीत बोलताना यासंदर्भात माहिती दिली. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोध होण्याचा इतिहास महाराष्ट्राच्या राजकारणात आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून टीका करताना गुप्त मतदान पद्धतीला विरोध करणार असल्याचं सांगितलं. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी खासगीत बोलताना जर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली तर भाजप उमेदवार देणार. आमचं संख्याबळ कमी करण्यासाठी आमच्या आमदारांना निलंबित केलं, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

राज्याच्या स्थापनेपासून गुप्तपणे अध्यक्षांची निवडणूक झालेली आहे. मात्र आता नियम बदलून आवाजी मतदानाने अध्यक्षांची निवडणूक घेण्याचा घाट घातला जात आहे. याचा अर्थ १७० आमदारांचा यांना असलेला पाठिंबा किती पोकळ आहे हे दिसून येतं. आमदारांवर विश्वास नसल्याने गुप्त मतदान पद्धती बदलली जात आहे. नियम समितीचे नियम डावलून प्रस्ताव मंजूर करणार आहे. त्याला आम्ही विरोध करू, असं फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

भाजपने राज्य सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. राज्यातील आघाडी सरकारने आम्हाला पहिल्यांदाच चहापानाचं आमंत्रण दिलं आहे. पण राज्यात अनागोंदी कारभार सुरू आहे. हे सरकार कोणत्याच मुद्द्यावर संवेदनशील नाही. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्ही सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा : Omicron Variant : लस न घेतलेल्या नागरिकांना ओमिक्रॉन ठरू शकतो जीवघेणा?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -