घरक्रीडामहाराष्ट्र केसरीचा अंतिम थरार आज रंगणार, गदा कोणाकडे जाणार?

महाराष्ट्र केसरीचा अंतिम थरार आज रंगणार, गदा कोणाकडे जाणार?

Subscribe

Maharashtra Kesari | स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू आहे. ६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशनाचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Maharashtra Kesari | पुणे – महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आज अंतिम सामना रंगणार असून महाराष्ट्र केसरीची गदा कोण घेऊन जातंय याकडे अवघ्या महाराष्ट्र लक्ष लागून राहिलं आहे. नांदेडचा शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात मॅट विभागातील लढत होणार असून सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात माती विभगातील अंतिम लढत होणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात सुरू असून आज सायंकाळी मॅट आणि त्यानतंर माती विभागातील दोन लढती होणार आहेत. यातील विजेत्यांमधून महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत खेळवण्यात येणार आहे.

हेही वाचा – कुस्तीचा थरार अंतिम टप्प्यात; हर्षवर्धनला डबल महाराष्ट्र केसरीची संधी

- Advertisement -

स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू आहे. ६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशनाचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

गेले अनेक दिवस चर्चेत असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला नवीन वर्षाचा मुहुर्त मिळाला. या स्पर्धेतील लढत चुरशीची झाली. माती व गादी या दोन्ही विभागात अटीतटीची लढत झाली. माती विभागाच्या उपांत्य फेरीत सोलापूरचा महेंद्र गायकवाड व कोल्हापूरचा शुभम शिदनाळे यांच्यात लढत झाली. महेंद्र गायकवाडने शुभम शिदनाळेवर मात केली. अवघ्या दहा सेकंदाचा हा खेळ झाला. महेंद्र गायकवाडने अशी खेळी खेळली की शुभमचा तोल गेला. त्याचाच फायदा घेत महेंद्र गायकवाडने शुभमला मात दिली. त्यामुळे महेंद्रचा विजय झाला व तो अंतिम फेरीत दाखल झाला.

- Advertisement -

माती विभागाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत वाशीमचा सिकंदर शेख व बुलढाण्याचा बालारफिक शेख यांच्यात लढत झाली. हा खेळ अवघ्या ३० सेकंदाचा झाला. बालारफिकला मात देत सिकंदरने अंतिम फेरीत प्रवेश केला. सिकंदर शेखने शेखवर पहिल्या १५ सेकंदातच ताबा मिळविला. आपले आक्रमण कायम ठेवत सिकंदर शेखने बालरफिकवर विजय मिळवला. चित्तथरारक हा सामना झाला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -