घरक्रीडाTokyo Olympics : सिंधूपासून मेरीपर्यंत...‘हे’ आहेत यंदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले भारतीय खेळाडू

Tokyo Olympics : सिंधूपासून मेरीपर्यंत…‘हे’ आहेत यंदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले भारतीय खेळाडू

Subscribe

यंदाच्या ऑलिम्पिकसाठी भारताने आतापर्यंतचे आपले सर्वात मोठे पथक टोकियोमध्ये धाडले आहे.

मागील वर्षी होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका वर्षाने लांबणीवर पडली होती. यंदा या स्पर्धेला २३ जुलै म्हणजेच शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत भारताच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे. भारताने २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदके जिंकली होती. ही भारताची आतापर्यंतची ऑलिम्पिक स्पर्धांमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. यंदा मात्र भारतीय खेळाडू १० पेक्षाही अधिक पदके जिंकू शकतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदाच्या ऑलिम्पिकसाठी भारताने आतापर्यंतचे आपले सर्वात मोठे पथक टोकियोमध्ये धाडले आहे. या पथकात १२० खेळाडूंचा समावेश असून ते विविध अशा ८५ क्रीडा प्रकारांत खेळणार आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार असलेले खेळाडू आहेत…

अ‍ॅथलेटिक्स : के.टी. इरफान (२० किमी चालणे), संदीप कुमार (२० किमी चालणे), राहुल रोहिल्ला (२० किमी चालणे), गुरप्रीत सिंग (५० किमी चालणे), भावना जाट (२० किमी चालणे), प्रियांका गोस्वामी (२० किमी चालणे), अविनाश साबळे (३००० मीटर स्टीपलचेस), मुरली श्रीशंकर (लांब उडी), एम.पी. जबीर (४०० मीटर अडथळ्यांची शर्यत), नीरज चोप्रा (भालाफेक), शिवपाल सिंह (भालाफेक), अन्नू राणी (भालाफेक), तेजेंदरपाल सिंग तूर (गोळाफेक), द्युती चंद (१०० आणि २०० मीटर धावणे), कमलप्रीत कौर (थाळीफेक), सीमा पुनिया (थाळीफेक), ४x४०० मिश्र रिले, ४x४०० पुरुष रिले

- Advertisement -

नेमबाजी : अंजुम मुद्गिल, अपूर्वी चंडेला, दिव्यांश सिंह पन्वर, दीपक कुमार, तेजस्विनी सावंत, संजीव राजपूत, ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, मनू भाकर, यशस्विनी सिंह देस्वाल, सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा, राही सरनोबत, एलावेनिल वालारिवान, अंगद वीर सिंह बाजवा, मैराज अहमद खान

बॅडमिंटन : पी.व्ही. सिंधू (महिला एकेरी), साई प्रणित (पुरुष एकेरी), सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी (पुरुष दुहेरी)

- Advertisement -

बॉक्सिंग : मेरी कोम (५१ किलो), सिमरनजीत कौर (६० किलो), लोव्हलिना बोर्गोहेन (६९ किलो), पूजा राणी (७५ किलो), अमित पांघल (५२ किलो), मनीष कौशिक (६३ किलो), विकास कृष्णन (६९ किलो), आशिष कुमार (७५ किलो), सतीश कुमार (९१ किलो)

कुस्ती : सीमा बिसला (५० किलो), विनेश फोगट (५३ किलो), अंशू मलिक (५७ किलो), सोनम मलिक (६२ किलो), रवी कुमार दहिया (५७ किलो), बजरंग पुनिया (६५ किलो), दीपक पुनिया (८६ किलो)

तिरंदाजी : तरुणदीप राय, अतानू दास, प्रविण जाधव, दीपिका कुमारी

टेनिस : सानिया मिर्झा आणि अंकिता रैना (महिला दुहेरी), सुमित नागल (पुरुष एकेरी)

टेबल टेनिस : शरथ कमल, साथियन, सुतीर्थ मुखर्जी, मनिका बात्रा

हॉकी : पुरुष संघ, महिला संघ

वेटलिफ्टिंग : मीराबाई चानू

गोल्फ : अनिर्बन लाहिरी, उदयन माने, आदिती अशोक

जिम्नॅस्टिक्स : प्रणती नायक

ज्युडो : सुशीला देवी लिकमबम

नौकानयन (रोईंग) : अर्जुन जाट, अरविंद सिंह

समुद्रपर्यटन (सेलिंग) : नेत्रा कुमानन, विष्णू सर्वनन, के. सी. गणपती आणि वरून ठक्कर

जलतरण : साजन प्रकाश, श्रीहरी नटराज, माना पटेल

अश्वशर्यत : फौवाद मिर्झा

तलवारबाजी : भवानी देवी

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -