घरक्रीडाTokyo Olympics : गोल्फर आदिती अशोकचे पदक अवघ्या एका स्थानाने हुकले

Tokyo Olympics : गोल्फर आदिती अशोकचे पदक अवघ्या एका स्थानाने हुकले

Subscribe

भारताला ऑलिम्पिक गोल्फमधील पहिलेवहिले पदक जिंकवून देण्याचे २३ वर्षीय आदितीचे स्वप्न अधुरेच राहिले.

भारताची गोल्फपटू आदिती अशोकचे ऑलिम्पिक स्पर्धांतील ऐतिहासिक पदक अवघ्या एका स्थानाने हुकले. तिसऱ्या फेरीपर्यंत दुसरे स्थान कायम राखणाऱ्या आदितीला अखेर चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यामुळे भारताला ऑलिम्पिक गोल्फमधील पहिलेवहिले पदक जिंकवून देण्याचे २३ वर्षीय आदितीचे स्वप्न अधुरेच राहिले. जागतिक क्रमवारीत २०० व्या स्थानी असलेली आदिती यंदा दुसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धांत खेळत होती. २०१६ सालच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पदार्पणात आदिती ४१ व्या स्थानी राहिली होती. यंदा मात्र तिने उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अमेरिकेच्या नेली कोर्डाने सुवर्णपदक पटकावले. जपानच्या मोने इनामीला रौप्य आणि न्यूझीलंडच्या लायडिआ कोला कांस्यपदक जिंकण्यात यश आले.

६८ दोषांकांसह चौथ्या स्थानी

अटीतटीच्या या स्पर्धेत चौथ्या फेरीच्या १६ होल्सनंतर आदिती तिसऱ्या स्थानावर होती. याच वेळी खराब हवामानामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी ७० होल्सचा खेळ झाला होता. आदितीची तिसऱ्या स्थानासाठी लायडिआ कोसोबत बरोबरी झाली होती. मात्र, पुढच्या दोन होल्समध्ये लायडिआने आघाडी घेतली आणि आदिती चौथ्या स्थानावर घसरली. दोन बोगीमुळे ती मागे पडली. ७२ होल्सचा खेळ संपल्यानंतर आदिती ६८ दोषांकांसह चौथ्या स्थानी राहिल्यामुळे तिचे पदक हुकले. रौप्यपदकासाठी इनामी आणि लायडिआ यांच्यात प्ले-ऑफ खेळवण्यात आले, ज्यात इनामीने बाजी मारली.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -