घरमुंबईयेत्या काही दिवसांत लोकल सुरु करण्याचा निर्णय होईल - मुख्यमंत्री

येत्या काही दिवसांत लोकल सुरु करण्याचा निर्णय होईल – मुख्यमंत्री

Subscribe

लोकल आणि हॉटेल्स सुरु करण्यासंदर्भात पुढील दोन ते पाच दिवसात निर्णय होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. कोरोना उलटणार नाही याची खबरदारी घेतोय, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील करोना निर्बंध शिथील झाल्यानंतर मुंबई लोकल ट्रेन कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लाखो मुंबईकरांना आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांनी बेस्टच्या पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक बसेसंचं लोकार्पण करताना लोकलसंदर्भात भाष्य केलं.

एकेक गोष्टींवरचे निर्बंध आपण सावधगिरी घेऊन शिथिल करत आहोत. कालच हॉटेल्स आणि रेस्टॉरंटचे मालक भेटून गेले. त्यांनी वेळेची शिथिलता द्यावी अशी विनंती केली आहे. लोकलच्या प्रवासासंदर्भात देखील निर्णय घ्यायचा आहे. आपण हे सर्व काही करणार आहोत फक्त पुरेशी काळजी घेऊन, कोरोना उलटणार तर नाही ना हेही आपणास पहावं लागणार आहे. लोकल आणि रेस्टॉरंट्स सुरु करण्याचा निर्णय आपण घेणार आहोत. तज्ज्ञांशी बोलतोय, तसंच महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलतोय. त्यानंतर दोन-पाच दिवसात कधी काय सुरु करणार याच्या सूचना दिल्या जातील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

- Advertisement -

‘बेस्ट’च्या इलेक्ट्रिक बसेसचं लोकार्पण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज बेस्टच्या पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक बसेसंचं लोकार्पण केलं. यावेळी कोरोना काळात सेवा बजावलेल्या सर्व वाहक-चालक, बेस्ट कर्मचारी यांचं अभिनंदन मुख्यमंत्र्यांनी केलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -