घरक्रीडाTokyo Olympics : कांस्यपदक पटकावल्यावर हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतला पंतप्रधान मोदींचा फोन, म्हणाले...

Tokyo Olympics : कांस्यपदक पटकावल्यावर हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतला पंतप्रधान मोदींचा फोन, म्हणाले…

Subscribe

कांस्यपदकाचा सामना भारताने ५-४ असा जिंकला.

भारतीय हॉकीसाठी गुरुवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. भारतीय पुरुष हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची कामगिरी केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत भारताने जर्मनीला ५-४ असे पराभूत केले. भारतीय संघ या लढतीत पिछाडीवर पडला होता. परंतु, दमदार पुनरागमन करत भारताला हा सामना जिंकत कांस्यपदक पटकावण्यात यश आले. या ऐतिहासिक यशानंतर भारतीय पुरुष हॉकी संघावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांना फोन करून विशेष अभिनंदन केले.

संपूर्ण देश खूप आनंदात आहे

कर्णधार मनप्रीतने फोन स्पीकरवर ठेवत मोदींना नमस्कार म्हटले. मोदी यांनी दुसऱ्या बाजूने हिंदीतून मनप्रीतचे अभिनंदन केले. ‘बहुत, बहुत, बहुत बधाईया (खूप शुभेच्छा),’ असे मोदी म्हणाले. तुझे आणि संपूर्ण हॉकी संघाचे खूप अभिनंदन. देशाला तुमच्या यशाने आनंद झाला आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळाले. तुम्ही खूप परिश्रम केले आहेत, माझ्याकडून संपूर्ण संघाला अभिनंदन सांग. संपूर्ण देश खूप आनंदात आहे, असेही मोदी म्हणाले. तसेच त्यांनी प्रशिक्षक रीड यांच्याशीही संवाद साधला. ‘प्रशिक्षक रीड तुमचे अभिनंदन. तुम्ही इतिहास रचला आहे. माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत,’ असे मोदींनी म्हटले.

- Advertisement -

भारतीय संघाची उत्कृष्ट कामगिरी

भारतीय पुरुष हॉकी संघाने १९८० सालच्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतरच्या ४१ वर्षांत भारताला एकही पदक जिंकता आले नव्हते. परंतु, यंदा भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. कांस्यपदकाच्या लढतीत भारतीय संघ १-३ असा पिछाडीवर पडला होता. त्यानंतर मात्र दमदार पुनरागमन करत भारताने हा सामना ५-४ असा जिंकला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -