घरलाईफस्टाईलशुगर लेवल वाढू लागल्यास मधुमेह रुग्णांमध्ये दिसू लागतात ही 5 लक्षणे,वेळीच सावध...

शुगर लेवल वाढू लागल्यास मधुमेह रुग्णांमध्ये दिसू लागतात ही 5 लक्षणे,वेळीच सावध व्हा

Subscribe

 

दैनंदिन जीवनात खूप जास्त काम,ताण-तणाव,मानसिक त्रास, दगदग यामुळे माणसाला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. वेळीच आजाराचे निदान न झाल्याने अनेकांना उपचारावीणा त्रास सहन करावा लागतो. अशातच आता मधुमेह म्हणजेच डायबिटिज सारख्या आजाराने अनेक व्यक्तींची झोप उडाली आहे. कारण मधुमेहामुळे अनेकदा हृदयावर ,किडणीवर प्रभाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मधुमेहाच्य रुग्णांमध्ये व्यक्तीच्या शरीरातील इंसुलिनचा स्तर वाढू किंवा कमी होऊ लागतो. केंद्र सरकारच्या माहितीनुसार 2025 पर्यंत मधुमेह रुग्णांच्या संख्येत 6.99 कोटी पर्यंत वाढ होऊ शकते. म्हणून वेळीच मधुमेहापासून सावधनता बाळगणे  तसेच योग्य औषधोपचार करणे गरजेच आहे.अेकदार मधुमेह झालेल्या रुग्णांना शुगर लेवल केव्हा वाढते तसेच कमी होते याचा पत्ता लागत नाही. यामुळे अचानक झालेल्या बदालावामुळे आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो. यासाठी शुगर लेवल कमी -जास्त झाल्यास कोणते लक्षण रुग्णामध्ये दिसतात याची माहिती जाणून घेऊयात

- Advertisement -

मधुमेह झालेल्या रुग्णांना सकाळी उठल्यानंतर शुगर लेवल जास्त प्रमाणात वाढल्याचे आढळून येते.कारण रात्री झोपताना शरीरातील हार्मोन्स कंट्रोल करण्यासाठी इंन्सुलिनचा वापर जास्त करावा लागतो.यामुळे सकाळी उठल्यानंतर शरीरात शुगर लेवल जास्त प्रमाणात वाढते. टाइप 2 डायबिटीज असणाऱ्या रुग्णांना याचा सर्वाधिक त्रास होण्याची शक्यता आहे.सामान्यत: मधुमेह रुग्णांना शुगर लेवल वढल्यास पुढील लक्षणे आढळून येतात.

  • चक्कर येणे.
  • शरीरावर सुज येणे.
  • घसा सुकणे(वारंवार पाणी प्यावेसे वाटणे)
  • डोळ्यासंमोर अंधार येणे
  • वारंवार झोप येणे.

अशी सामान्य लक्षणे जाणवू लागतात. पण या सामान्य वाटणाऱ्या गोष्टीमुळे शुगर लेवल वाढली आहे याकडे दुर्लक्षित करु नये.

- Advertisement -

हे हि वाचा – चॉकलेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी,चॉकलेट खा आणि वजन कमी करा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -