घरICC WC 2023Travis Head : शेन वॉर्नची 7 वर्ष जुनी भविष्यवाणी खरी ठरली; हेडबद्दल...

Travis Head : शेन वॉर्नची 7 वर्ष जुनी भविष्यवाणी खरी ठरली; हेडबद्दल काय म्हटले?

Subscribe

नवी दिल्ली : आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेच्या (ICC ODI World Cup 2023) अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 6 विकेट्सने पराभव करत सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. त्यामुळे भारतीय संघाचे तिसऱ्यांजा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. या पराभवाचा खेळाडूंना नाही तर भारतीय चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. खरं तर भारताच्या पराभवात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने महत्त्वाची भूमिका बजावली. याच ट्रॅव्हिस हेडबदद्ल ऑस्ट्रेलियाचा दिवंगत फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे ट्वीट व्हायरल होत आहे. (Travis Head Shane Warnes 7 year old prediction comes true What about the head)

हेही वाचा – Travis Head : रोहित शर्माबाबत ट्रॅव्हिस हेडचे विधान चर्चेत; सामना जिंकल्यानंतर काय म्हणाला?

- Advertisement -

 ट्रॅव्हिस हेडने या वर्षी जूनमध्ये भारताकडून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ट्रॉफी हिसकावून घेतली होती आणि त्यानंतर आता वर्षाच्या अखेरीस भारताच्या हातून विश्वचषक ट्रॉफीही हिसकावून घेतली आहे. ट्रॅव्हिस हेडने इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात शतक झळकावले होते आणि त्याने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही भारताविरुद्ध शतक झळकावले आहे. त्यामुळे यावर्षी भारताचा सर्वात मोठा शत्रू ऑस्ट्रेलिया नसून त्यांचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आहे, असेच म्हणावे लागेल. याच ट्रॅव्हिस हेडला 2016 मध्येच शेन वॉर्नने भावी सुपरस्टार म्हटले होते.

- Advertisement -

ट्रॅव्हिस हेडने ऑस्ट्रेलियन संघासाठी एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यावेळी दिवंगत ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्नचे 2016 मध्ये केले एक ट्विट केले होते जे आता विश्वचषक 2023 नंतर व्हायरल होत आहे. ज्यात त्याने म्हटले होते की, “एक क्रिकेटपटू म्हणून मी ट्रॅव्हिस हेडचा खूप मोठा चाहता आहे, मला विश्वास आहे की तो खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी भविष्यातील स्टार असेल.” वॉर्नचे हे शब्द 2023 मध्ये सिद्ध झाले आहेत. तो ऑस्ट्रेलियासाठी मोठा स्टार खेळाडू बनताना दिसत आहे.

हेही वाचा – Mitchell Marsh : सामना जिंकल्यानंतर खेळाडूचे ट्रॉफीसोबत लाजिरवाणे कृत्य; सोशल मीडियावर तुफान ट्रोल

ट्रॅव्हिस हेडचा सामनावीर पुरस्काराने गौरव

29 वर्षीय ट्रॅव्हिस हेडने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामन्यात भारताविरुद्ध 120 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 137 धावांची खेळी केली आहे. या खेळीसाठी त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली आहे. कारण विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एकाही फलंदाजाला हेडसारखी कामगिरी करता आली नाही. भारताकडून विराट कोहली आणि केएल राहुने तर ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅबुशेनने अर्धशतके झळकावले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -