घरमहाराष्ट्रमोठी बातमी: अंतरवाली सराटीत लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? माहिती अधिकारात वेगळीच माहिती...

मोठी बातमी: अंतरवाली सराटीत लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? माहिती अधिकारात वेगळीच माहिती समोर

Subscribe

मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जालन्याचे पोलीस उपाधीक्षक आर सी शेख यांनी ही माहिती दिली आहे.

जालना:अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचाराबद्दल सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलकांवर झालेल्या या लाठीहल्ला प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्दोष असल्याचा महत्त्वाचा खुलासा झाला आहे. माहिती अधिकारातून ही बाब स्पष्ट झाली आहे. (Big News Who ordered lathi charge in Anravali Sarati Truth in Right to Information Devendra Fadnavis )

मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जालन्याचे पोलीस उपाधीक्षक आर सी शेख यांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी जालन्यातील लाठीचार्जचे आदेश कुणी दिले होते याची माहिती मागवली होती. त्यावर जालन्याचे पोलीस उपअधीक्षक आर सी शेख यांनी माहिती दिली. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांकडून आदेश देण्यात आले नाहीत, असं त्यात म्हटलं आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्याविरोधात राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला गेला. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर त्यावेळी जोरदार दगडफेक करण्यात आली होती.

- Advertisement -

जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश कोणी दिले होते, असा विरोधकांनी प्रश्न केला होता. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरीदेखील व्यक्त केली होती आणि तसा आदेश गृहमंत्रालयाकडून दिला गेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. तरीही जालन्यातील घटनेवरून फडणवीसांवर अनेकांनी आरोप केले होते.

आमच्या बापजाद्यांनी अनेकांना दिलं

पुण्यातील सभेतून बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, खराडी आणि पुणे शहरातील माझ्या तमाम मराठा बांधवाना माझा जय शिवराय… मराठा आरक्षणची लढाई खूप वर्षांपासून सुरू आहे. अनेकांनी टोकाची झुंज दिली आहे. आम्ही सगळ्यांच्या कल्याणासाठी लढत राहिलो. पण आता आरक्षण मिळणे गरजेचे आहे. आम्ही कधी जातीवाद केला नाही. सगळ्यांच्या पाठीवर प्रेमाचा हात फिरवण्याचा काम मराठ्यांनी केले. माझ्या बांधवांनी कधीच कुणाची जात शोधली नाही. प्रत्येकाला आम्ही आधार दिला. माझ्या बापजाद्यांनी अनेकांना दिले. स्वत:चे लेकरू उघड पडले पण दुसऱ्याच्या लेकरांना सगळे दिले. जात ही कधी त्यांनी मानली नाही. माझ्या बापाने लोकांच्या लेकरांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे काम केले. लोकांना माझ्या बापाने पोटभरं दिले. पण स्वतःच्या लेकराला उपाशी ठेवले. दुसऱ्यांच्या लेकराच्या सुखात स्वतःच्या पोराचे सुख मानले.

(हेही वाचा: ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कॅसिनो एकच…, चंद्रशेखर बावनकुळेंचा ‘त्या’ फोटोबद्दल खुलासा )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -