घरक्रीडाUEFA EURO : बेल्जियमची गतविजेत्या पोर्तुगालवर मात; उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

UEFA EURO : बेल्जियमची गतविजेत्या पोर्तुगालवर मात; उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Subscribe

बेल्जियमला यंदाची स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.

थोर्गन हजार्डने केलेल्या उत्कृष्ट गोलच्या जोरावर बेल्जियमने युएफा युरो २०२० फुटबॉल स्पर्धेतील उप-उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात गतविजेत्या पोर्तुगालवर १-० अशी मात केली. या पराभवामुळे क्रिस्तिआनो रोनाल्डोच्या पोर्तुगालचे युरो स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. बेल्जियमने मात्र दमदार खेळ सुरु ठेवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून या फेरीत त्यांचा सामना इटलीशी होणार आहे. बेल्जियमला यंदाची स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्यांनी पोर्तुगालविरुद्ध १९८९ नंतरचा आपला पहिला विजय मिळवत आपली दावेदारी सिद्ध केली आहे.

- Advertisement -

मुनिएरच्या पासवर हजार्डचा उत्कृष्ट गोल

स्पेनमधील सेव्हिल येथे झालेल्या उप-उपांत्यपूर्व फेरीतील सामन्याच्या सुरुवातीला गतविजेत्या पोर्तुगालने चांगला खेळ केला. सहाव्या मिनिटाला दिओगो जोटा गोल करण्याची संधी मिळाली, पण त्याला फटका गोलवर मारण्यात अपयश आले. तसेच कर्णधार रोनाल्डोने फ्री-किकवरून मारलेला फटका बेल्जियमचा गोलरक्षक कोर्टवाने अडवला. यानंतर मात्र बेल्जियमने आपल्या खेळात सुधारणा केली. मध्यंतराला तीन मिनिटे असताना थॉमस मुनिएरच्या पासवर थोर्गन हजार्डने उत्कृष्ट फटका मारून गोल करत बेल्जियमला १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात पोर्तुगालने अधिक आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. परंतु, त्यांना बेल्जियमचा भक्कम बचाव भेदता आला नाही.

आमच्या कामगिरीचा अभिमान – रोनाल्डो  

आम्हाला अपेक्षित निकाल मिळवता आला नाही आणि आम्ही स्पर्धेबाहेर झालो आहोत. मात्र, आम्हाला आमच्या कामगिरीचा अभिमान आहे. युरो स्पर्धेचे जेतेपद राखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. आमचा संघ पोर्तुगालच्या लोकांना आनंद देऊ शकतो हे आम्ही सिद्ध केले आहे, असे बेल्जियमविरुद्धच्या पराभवानंतर पोर्तुगालचा कर्णधार क्रिस्तिआनो रोनाल्डो म्हणाला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -