घरक्रीडाIPL 2020 : बीसीसीआयला आयपीएलसाठी पंच मिळेनात

IPL 2020 : बीसीसीआयला आयपीएलसाठी पंच मिळेनात

Subscribe

कोरोना महामारीच्या धर्तीवर १९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएलवर कोरोनाचे परिणाम दिसून येत आहेत. युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या हंगामाची सुरुवात झालेली नाही. मात्र, स्पर्धा सुरु व्हायच्या आधीच काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, आता बीसीसीआयसमोर नवं संकट उभं राहिलं आहे. बीसीसीआयला आयपीएलसाठी पंच मिळत नसल्याची बातमी समोर येत आहे. आयसीसी एलिट पॅनेलचे पंच जगातील सर्वात महागड्या लीगमध्ये सामील होण्यात रस दाखवत नाही आहेत.

कोरोनाच्या भीतीपोटी पंच आयपीएलसाठी नकार देत आहेत. मात्र, स्पष्ट न सांगता इतर कारण देऊन नकार देत आहेत. दरम्यान, बीसीसीआय पंचांची मनधरणी करत असल्याचं सुत्रांनी सांगितलं. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार आतापर्यंत परदेशातील फक्त तीन एलिट पॅनेलच्या पंचांनी या स्पर्धेत काम करण्यास सहमती दर्शविली आहे. सामना रेफरीबद्दल बोलताना फक्त जवागल श्रीनाथ यांनीच यावर सहमती दर्शविली आहे. आयपीएलच्या हंगामात बीसीसीआय साधारणपणे सहा परदेशी एलिट पॅनेल पंच नियुक्त करते.

- Advertisement -

सध्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा नसल्यामुळे अधिक एलिट पॅनेल पंच या वेळी आयपीएलमध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा होती. आयपीएलचे नियमित भाग असलेले श्रीलंकेचे पंच कुमार धर्मसेना यांनीही बीसीसीआयला स्पष्टपणे नकार दिला आहे. श्रीलंकेत क्रिकेटमध्ये व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. एलिट पॅनेलचे तीन परदेशी पंच क्रिस गॅफने (न्यूझीलंड), रिचर्ड इलिंगवर्थ, मायकाल गॉफ (इंग्लंड) तसेच भारताचे नितीन मेनन यांनी आतापर्यंत आयपीएल २०२० साठी सहमती दर्शविली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -