घरक्रीडाविजेंदरची विजयाची परंपरा कायम; सलग अकरावा विजय

विजेंदरची विजयाची परंपरा कायम; सलग अकरावा विजय

Subscribe

बॉक्सिंग स्टार विजेंदर सिंगने पुन्हा एकदा प्रो-बॉक्सिंग स्पर्धेत बाजी मारली आहे. प्रो-बॉक्सिंगमधला हा त्याचा अकरावा सामना होता. हा सामना जिंकून त्याने विजयाची परंपरा कायम ठेवली आहे.

बॉक्सिंग स्टार विजेंदर सिंगने प्रो-बॉक्सिंगमध्ये पुन्हा एकदा अभिमानास्पद कामगिरी केली आहे. विजेंदरने अमेरिकेच्या माइक स्नायडरचा पराभव करुन बॉक्सिंग लकरिअरमधला अकरावा विजय मिळवला. आज सकाळी ही लढत झाली. अमेरिकेच्या नेवार्क अर्थात न्यूजर्सी येथे हा सामना खेळला गेला. या सामन्यात विजेंदरने स्नायडरला नॉकआऊट केले. विशेष म्हणजे विजयने आतापर्यंत प्रो-बॉक्सिंगमध्ये ११ सामने खेळले आहेत आणि हे सर्व सामने विजयने जिंकले आहेत.

विजयने ट्विटरवर शेअर केला व्हिडिओ

आजच्या सामन्यानंतर विजयी झाल्याबद्दलचा एक व्हिडिओ विजयने शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्याने ‘गान अर्पित, प्राण अर्पित, रक्‍त का कण-कण समर्पित, चाहता हूँ देश की धरती, तुझे कुछ और भी दूँ ‘, असे लिहले आहे.

- Advertisement -

वर्षभरापासून बॉक्सिंग पासून होता दूर

विजय गेल्या वर्षभरापासून बॉक्सिंगपासून दूर होता. मध्यंतरी तो राजकारणात शिरला होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर त्याने उमेदवारी लढवली होती. या निवडणुकीत त्याचा पराभव झाला होता. या पराभवानंतर विजयने पुन्हा बॉक्सिंगमध्ये पर्दापण करण्याचे ठरवले. साधारम एक वर्षानंतरच्या गॅपनंतर विजय खेळत असला तरी त्याचा काहीच परिणाम विजयच्या खेळावर जाणवला नाही. त्यामुळे विजयचे कौतुक होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोण होणार नवा जगज्जेता?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -