घरक्रीडाकरोनामुळे टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलणार?

करोनामुळे टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलणार?

Subscribe

करोना विषाणूचा फटका टोकियो ऑलिम्पिकला बसण्याची शक्यता आहे. टोकियो ऑलिम्पिकबाबत विविध विधाने केली जात आहेत. करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले, तर या स्पर्धेच्या आयोजनाचा विचार करण्यात येईल, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) सदस्य डिक पाऊंड काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. तर ऑलिम्पिक ठरल्याप्रमाणेच होणार, असे आयोजकांनी सांगितले होते. मात्र, ही स्पर्धा रद्द न होता, पुढे ढकलण्यात येऊ शकेल. टोकियोने आयओसी सोबत केलेल्या करारामध्ये ही स्पर्धा पुढे ढकलून वर्षाअखेरीस घेण्याची परवानगी आहे, अशी माहिती जपानच्या ऑलिम्पिक मंत्र्यांनी मंगळवारी दिली.

२०२० टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला २४ जुलैपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा २०२० वर्षात झाली पाहिजे, पण ठराविक महिन्यातच झाली पाहिजे असे करारात दिलेले नाही. याबाबत जपानच्या ऑलिम्पिक मंत्री सेइको हाशिमोटो संसदेत म्हणाल्या, करारानुसार टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २०२० वर्षात झाली पाहिजे. याचाच अर्थ असा की आम्हाला ही स्पर्धा पुढे ढकलता येऊ शकेल. ऑलिम्पिक स्पर्धा जर २०२० मध्ये झाले नाही, तरच आयओसीला ही स्पर्धा रद्द करण्याचा अधिकार आहे.

- Advertisement -

आयोजनासाठी केलेल्या करारानुसार ऑलिम्पिक रद्द करण्याचा अधिकार आयओसीला आहे. करोना विषाणूमुळे आतापर्यंत जपानमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु, असे असतानाही टोकियो ऑलिम्पिक ठरलेल्या वेळीच सुरु व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे सेइको हाशिमोटो यांनी नमूद केले.

स्पर्धा रद्द होणे पडेल महागात!
टोकियो ऑलिम्पिक रद्द होणे जपानला महागात पडू शकेल. या स्पर्धेसाठी १.३५ ट्रिलियन येन (१ लाख ३५ हजार कोटी रुपये) इतका खर्च येणार आहे. जपान सरकारने ऑलिम्पिक स्टेडियम बनवण्यासाठी १२० बिलियन येन (१२ हजार कोटी रुपये), तसेच २०२० पॅरालिम्पिकसाठी ३० बिलियन येनची (३ हजार करोड रुपये) तरतूद केली आहे, असे सेइको हाशिमोटो यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -