घरक्रीडाआयपीएलसाठी आशिया चषक रद्द करायला देणार नाही; पाकिस्तानचा भारताला इशारा

आयपीएलसाठी आशिया चषक रद्द करायला देणार नाही; पाकिस्तानचा भारताला इशारा

Subscribe

कोरोनामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. आयपीएल यावेळी आशिया चषक रद्द करुन खेळवणार असल्याची चर्चा आहे.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेसाठी सप्टेंबरमध्ये युएईमध्ये होणारा आशिया चषक रद्द करण्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नकार दिला आहे. २९ मार्च ते २४ मे या दरम्यान आयपीएल होणार होती, परंतु भारतात प्राणघातक विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढल्यामुळे अनिश्चित काळासाठी आयपीएल तहकूब करण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अहसान मनी मंगळवारी कराची येथे म्हणाले, “मी या अनुमानांबद्दल वाचलं आणि ऐकलं आहे, परंतु आशिया चषक स्पर्धा आयोजित केली जाते की नाही हे पाकिस्तान आणि भारत यांच्यातील निर्णय नाही, इतर देशदेखील त्यात जोडलेले आहेत, हे या क्षणी लक्षात घ्या.” पाकिस्तानने या स्पर्धेचे आयोजन केले होते, परंतु सुरक्षा समस्या आणि दोन्ही देशांमधील तणावामुळे भारत पाकिस्तानमध्ये जाण्यास कचरत आहे. त्यामुळे ही स्पर्धा दुबई आणि अबुधाबीमध्ये खेळवण्यात येणार आहे.


हेही वाचा – CoronaEffect: यंदाचे IPL सामने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले; BCCI चा निर्णय

- Advertisement -

पीसीबीने प्रसिद्ध केलेल्या पॉडकास्टमध्ये मनी म्हणाले, “जर क्रिकेट सुरू झालं तर आशिया चषक खेळणं महत्वाचं आहे, कारण आशिया खंडातील क्रिकेटचा विकास या स्पर्धेतील पैशावर अवलंबून आहे. आशियाई क्रिकेट कौन्सिलचे सदस्य असलेल्या बर्‍याच देशांसाठी हे महत्त्वाचं आहे.” यावर्षी आशिया चषक हे एक मोठं आव्हान आहे. कारण स्पर्धा होईल की नाही ठाऊक नाही, असं मनी म्हणाले. पुढे म्हणाले, ‘ही स्पर्धा होईल की नाही हे आम्हाला ठाऊक नाही, परंतु जर परिस्थिती बदलली आणि आम्ही आशिया चषक आयोजित करण्यास सक्षम असू तर ते केले पाहिजे कारण यातून मिळणाऱ्या महसूलाचं वाटप पुढील दोन वर्ष देशातील खेळाच्या विकासासाठी केलं जातं.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामधील टी -२० विश्वचषक पुढे ढकलल्यास अनेक सदस्य देशांसाठी मोठे आर्थिक संकट असेल, असा इशाराही मनी यांनी दिला. मनी म्हणाले, “जर आयसीसीने सदस्यांना या स्पर्धेतील आपला वाटा दिला नाही तर त्याचा अनेक देशांवर आर्थिक परिणाम होईल.” जून आणि जानेवारीत पाकिस्तानला सुमारे ७० ते ८० लाख डॉलर्स मिळणार होते, असं मनी म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -