घरक्रीडाविस्डेनच्या दशकातील टी २० संघ

विस्डेनच्या दशकातील टी २० संघ

Subscribe

2019 चे वर्ष आता संपत आले आहे. त्यामुळे 2010-2019 या दशकाचीही सांगता होत आहे. याचनिमित्ताने अनेकांनी दशकातील सर्वोत्तम संघ निवडले आहेत. यामध्ये विस्डेनने दशकातील सर्वोत्तम वन-डे आणि कसोटी संघापाठोपाठ आता टी-20 संघाचीही घोषणा केली आहे. या सर्वोत्तम 11 जणांच्या संघात विस्डेनने विविध संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या खेळाडूंना स्थान दिले आहे.या संघात तिसर्‍या क्रमांकासाठी विस्डेनने भारताचा कर्णधार विराट कोहलीची निवड केली आहे.तर गोलंदाजीत जसप्रित बुमराहला स्थान देण्यात आले आहे. मात्र या संघात भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि टी 20मधील सर्वात यशस्वी सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा यांना स्थान दिलेले नाही.

विस्डेनच्या या टी20 संघात सलामीवीर म्हणून ऑस्ट्रेलियाचा मर्यादीत षटकांचा कर्णधार ऍरॉन फिंच आणि न्यूझीलंडचा फलंदाज कॉलिन मुनरो यांना स्थान दिले आहे. तसेच फिंचला विस्डेनने या दशकातील सर्वोत्तम टी20 संघाचे कर्णधारपदही देण्यात आले आहे.

- Advertisement -

विराट पाठोपाठ चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसनची निवड केली आहे. या संघात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल, इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉस बटलर यांनाही स्थान मिळाले आहे. तसेच अफगाणिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद नबीला सातव्या क्रमांकासाठी जागा मिळाली आहे. त्यानंतर डेव्हिड विली, राशिद खान, जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा यांना या टी20 संघात गोलंदाज म्हणून स्थान मिळाले आहे.

विस्डेनचा या दशकातील सर्वोत्तम टी20 संघ

ऍरॉन फिंच (कर्णधार), कॉलिन मुनरो, विराट कोहली, शेन वॉटसन, ग्लेन मॅक्सवेल, जॉस बटलर (यष्टीरक्षक), मोहम्मद नबी, डेव्हिड विली, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -