घरताज्या घडामोडीमंत्रिपद नाकारल्यानंतर संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत यांची प्रतिक्रिया

मंत्रिपद नाकारल्यानंतर संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत यांची प्रतिक्रिया

Subscribe

सोमवारी विधीमंडळ परिसरात महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळा विस्ताराचा शपविधी सोहळा पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकूण ३६ आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यात २६ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची तर १० आमदारांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी ज्यांच्या महत्त्वाचा वाटा होतो ते म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत या सोहळ्याला उपस्थित नव्हते. बंधू आमदार सुनील राऊत यांना मंत्रिमंडळ विस्तारात कोणतेही स्थान दिले नसल्यामुळे संजय राऊत या शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हते अशी चर्चा रंगली होती. या कारणामुळे ते पक्षावर नाराज असल्याचे देखील बोललं जात आहे. मात्र आता बंधू सुनील राऊत यांनी याबाबत खुलासा केला आहे.

कडवट शिवसैनिक आहे

सुनील राऊत या रंगलेल्या चर्चेला पूर्णविराम देतं असं म्हणाले की, ‘आज शिवसेनेसह महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यावेळेस सुनील राऊत यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने नाराज असल्याचे वृत्त पसरवले. तसंच मी आमदार पदाचा राजीनामा देत असल्याच देखील सांगण्यात आलं. हे सगळं चुकीचं आणि दिशाभूल करणारं आहे. मी कडवट शिवसैनिक आहे. राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आली यासारखी अभिमानाची गोष्ट दुसरी नाही. कोणत्याही कारणाने मी नाराज असल्याचा प्रश्न उद्भवत नाही. हा खुलासा माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी पुरेसा आहे.’

- Advertisement -

दरम्यान तीनही पक्षांतील काही नेत्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नेते पक्षांवर नाराज असल्याच समोर येत आहे. अनेकांनी आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली आहे.


हेही वाचा – राष्ट्रवादीच्या २ आमदारांची नियुक्ती रोखली; शपधविधीनंतर राज्यपालांच्या विरोधात नाराजी वाढली

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -