घरक्रीडा‘यॉर्करमॅन’ मलिंगा विश्वचषक विक्रमवीर

‘यॉर्करमॅन’ मलिंगा विश्वचषक विक्रमवीर

Subscribe

मॅकग्राचा विक्रम मोडला

श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगाने शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला. वर्ल्डकपमध्ये खेळताना सर्वाधिक जलद ५० विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. यावेळी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ग्लेन मॅकग्रा आणि श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन या दिग्गज गोलंदाजांच्या नावावर होता.

शुक्रवारी श्रीलंका विरुद्ध इंग्लंड यांच्यात सामना झाला. मलिंगाने ३३ व्या षटकात जोस बटलरला अवघ्या १० धावांवर बाद करीत सर्वाधिक जलद ५० गडी बाद करण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर केला. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मलिंगाने १० षटकांत ४३ धावा देत ४ गडी बाद केले. सर्वात जलद ५० गडी बाद करण्याचा विक्रम याआधी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा आणि श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन या दोघांच्या नावावर संयुक्तपणे होता. या दोन्ही महान खेळाडूंनी सर्वाधिक जलद ५० गडी बाद केले होते. यासाठी या दोन्ही खेळाडूंना वर्ल्डकपमध्ये ३० सामने खेळावे लागले होते.

- Advertisement -

परंतु, लसिथ मलिंगाने अवघ्या २६ सामन्यांत ही किमया साधली आहे. तर वसीम अक्रम तिसर्‍या स्थानावर आहे. वसीमने ३४ सामन्यात ५० गडी बाद केले. इंग्लंडविरुद्ध खेळताना मलिंगाने जेम्स विन्सी (१४), जॉन बेयरस्टो (शून्य), जो रूट (५७) आणि जोस बटलर (१०) धावांवर या प्रमुख फलंदाजांना बाद केले. ४३ धावा देऊन ४ गडी बाद करणार्‍या मलिंगाचे वर्ल्डकपमधील हे दुसरे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन ठरले. या सामन्यात ४ गडी बाद करणारा मलिंगा ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -