घरक्रीडाIPL Retention : RCB ने रिटेन न केल्याने भावुक युजवेंद्र चहल; भावनिक...

IPL Retention : RCB ने रिटेन न केल्याने भावुक युजवेंद्र चहल; भावनिक मेसेज करत म्हणाला…

Subscribe

आयपीएल २०२२ साठी आरसीबीकडून रिलीज केल्यानंतर चहलने सोशल मीडियावर एक भावनिक मेसेज शेयर केला आहे

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलचा २०२१ च्या टी-२० विश्वचषकात संघात समावेश करण्यात आला नव्हता. त्याच्या जागेवर फिरकीपटू राहुल चाहरला संघात स्थान मिळाले होते. दरम्यान विश्वचषकानंतर झालेल्या न्यूझीलंडविरूध्दच्या टी-२० मालिकेत चहलने भारतीय संघात जागा मिळवली होती. मात्र, आता त्याला मोठा झटका बसला आहे त्याला आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फ्रँचायझीने मेगा ऑक्शनच्या पूर्वसंध्येला रिलीज केले आहे. आरसीबीकडून रिलीज केल्यानंतर चहलने सोशल मीडियावर एक भावनिक मेसेज शेयर केला आहे. त्यामध्ये त्याने आरसीबी सोबत घालवलेल्या ८ वर्षांच्या मोठ्या प्रवासाला उजाळा दिला आहे. त्याने म्हंटले की तो २०२२ च्या आयपीएलमध्ये कदाचितच सहभागी होऊ शकतो.

इंस्टाग्रामच्या माध्यमातून चहलने म्हंटले की, “आरसीबीच्या संघात ८ वर्ष राहिल्यानंतर मला खूप अनुभव मिळाला आहे. या संघासोबत माझ्या खूप आठवणी जोडल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मला ते कुटुंब मिळालं आहे जे प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी मागत असतो. आम्ही केवळ खेळू शकतो आणि आमच्या संघासाठी शानदार प्रदर्शन करू शकतो. चिन्नास्वामी स्टेडियम आणि माझे चाहते, तुमची आठवण येत राहिल. मला प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल तुम्हा सर्व चाहत्यांचा हृदयापासून आभारी आहे धन्यवाद. दुसऱ्या बाजूला भेटू”.

- Advertisement -

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23)

- Advertisement -

चहलचे आयपीएल मधील प्रदर्शन

चहलने आतापर्यंत आरसीबीसाठी एकूण ११३ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने २२.०३ च्या सरासरीने १३९ बळी घेतले आहेत. तो आरसीबीसाठी सर्वाधिक बळी पटकावणारा गोलंदाज देखील ठरला आहे. तरीदेखील फँचायझीने चहलला यावेळी आरसीबीमध्ये रिटेन केले नाही. बंगळुरूच्या फँचायझीने २०२२ च्या आयपीएलसाठी मेगा ऑक्शनच्यापूर्वी विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, आणि मोहम्मद सिराजला रिटेन केले आहे. चहल आरसीबीचा हिस्सा होण्याअगोदर मु्ंबई इंडियन्सच्या संघाचा भाग होता. त्याचा २०१५ मध्ये बंगळुरूच्या संघात समावेश झाला. त्यानंतर चहलने भारतीय संघात देखील पदार्पण केले.


हे ही वाचा : http://IND vs NZ 2nd Test : भारताचे न्यूझीलंडला ५४० धावांचे लक्ष्य


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -