घरटेक-वेकPUBG चीनी की दक्षिण कोरियन? डेटा आणि प्रायव्हसी पॉलिसीबद्दल जाणून घ्या

PUBG चीनी की दक्षिण कोरियन? डेटा आणि प्रायव्हसी पॉलिसीबद्दल जाणून घ्या

Subscribe

भारत सरकारने काही दिवसांपूर्वीच ५९ चिनी Apps वर बंदी घातली. त्यानंतर पुन्हा एकदा काही Apps चे क्लोन प्ले स्टोअरवर दिसत आहेत. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा ४७ चिनी Apps च्या क्लोनवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हे Apps जुन्या बंदी घातलेल्या Apps चे क्लोन आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार २५० हून अधिक चिनी Apps ची यादी तयार केली जात आहे. यामध्ये PUBG मोबाईलचं नावदेखील असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतात PUBG मोबाईलवर बंदी घातली जाऊ शकते? हा App देखील चिनी Apps च्या प्रकारातील आहे का? डेटा सुरक्षितता आणि गोपनीयता, याप्रश्नांची उत्तरं आज मिळतील.

PUBG चीनी की दक्षिण कोरियन?

PUBG मोबाईल चीनी आहे की कोरियन, यावर चर्चा सुरु आहे. PUBG मोबाईल कोरियन असल्याची चर्चा आहे कारण PUBG मोबाईल बनविणारी कंपनी ब्ल्यूहोल आहे, ती चीनची नसून दक्षिण कोरियाची आहे. प्लेअर अननोन बॅटलग्राऊंड म्हणजेच PUBG मल्टी प्लेअर गेमिंगला ब्ल्यूहोल कंपनीने बनवला आहे. ही कंपनी दक्षिण कोरियन ब्ल्यूहोल स्टुडिओची सहाय्यक कंपनी आहे. गूगल प्ले स्टोअर आणि App स्टोअरवर PUBG मोबाइल २०१८ मध्ये लाँच करण्यात आला.

- Advertisement -

PUBG व्हिडीओ गेम अधिकाधिक लोकप्रिय झाला आणि यामुळे, चीनमधील सर्वात मोठी व्हिडीओ गेम प्रकाशक, टेंसेंट गेम्स कंपनीने हा गेम चीनमध्ये लाँच करण्यासाठी आणि कंपनीमध्ये भागीदारी खरेदी करण्यासाठी दक्षिण कोरियन ब्ल्यूहोलशी चर्चा केली.

चीनी कंपनी टेंसेंटची एंट्री

चीनी कंपनी टेंसेंट गेम्सने ब्ल्यूहोलमध्ये स्टेक खरेदी केला. दरम्यान, PUBG मोबाईल आवृत्ती टेंसेंटने विकसित केली होती. यानंतर, टेंसेंट PUBG मोबाइल गेमचा प्रकाशक झाला. तेव्हापासून, PUBG मोबाइल उघडल्यावर टेंसेंटचा लोगो दिसतो, जी चीनी कंपनी आहे. PUBG आणि PUBG मोबाईलमध्ये फरक आहे. या दोघांच्या प्रकाशकांमध्ये फरक आहे. चीनमध्ये ब्लूहोलने टेंसेंटसमवेत PUBG मोबाईल बाजारात आणला.

- Advertisement -

सुरुवातीला, टेंसेंटने PUBG चीनमध्ये लाँच करण्यासाठी अधिकार मिळवले. यानंतर, या खेळाची मोबाइल आवृत्ती आणण्यासाठी कंपनीने ब्ल्यूहोलबरोबर भागीदारी केली. एकंदरीत, PUBG मोबाईल हा गेम टेंसेंटने तयार केला आणि चीनमध्ये लाँच केला.

प्रायव्हसीचं काय?

PUBG मोबाईलचे प्रायव्हसी पॉलिसी ही इतर Apps सारखीच आहे जे वापरकर्त्यांच्या बर्‍याच महत्त्वपूर्ण आणि अनावश्यक माहितीमध्ये प्रवेश करतो. PUBG मोबाईलचे प्रायव्हसी पॉलिसी बद्दल सांगण्यात आलं आहे की कंपनीचे सर्व्हरही भारतात आहेत आणि इथल्या वापरकर्त्यांचा डेटा त्याच्या सर्व्हर्समध्ये साठवला आहे. शिवाय, त्याचे सर्व्हर चीनमध्येही आहेत. कंपनी अमेरिका आणि सिंगापूरमधील सर्व्हरवरील काही डेटा देखील संचयित करते.

आपला डेटा तृतीय पक्षासह सामायिक केला जाऊ शकतो

जोपर्यंत वापरकर्त्याची वैयक्तिक माहिती सामायिक करण्याचा प्रश्न आहे, PUBG मोबाईलच्या भारतीय वापरकर्त्यांचा डेटा कंपनी कोणत्याही तृतीय पक्षास देऊ शकते. कंपनीने लिहिलं आहे की, “आम्ही कोणत्याही तृतीय पक्षाला तुमचा डेटा संकलित करण्यास व वापरण्यास परवानगी देतो, कोणत्याही तृतीय पक्षाच्या वापरकर्त्यांनी कुणाबरोबरही वैयक्तिक माहिती जाहीर करू नये” याची खात्री करण्यासाठी आम्ही जबाबदार आहोत.

कोणत्याही सुरक्षेची हमी नाही

कंपनीच्या धोरणानुसार PUBG वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहिती सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे. परंतु कंपनीने असंही म्हटलं आहे की माहितीची देवाणघेवाण इंटरनेटद्वारे होत असल्याने ती पूर्णपणे सुरक्षित नाही.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -