घरटेक-वेकइन्स्टाग्राममुळे भेटू शकणार 'बिछडे दोस्त'

इन्स्टाग्राममुळे भेटू शकणार ‘बिछडे दोस्त’

Subscribe

इन्स्टाग्राम आता एका नव्या फीचरचं परीक्षण सध्या करत आहे. आपल्या मित्रांना शोधण्यासाठी हे अॅप आता मदत करणार आहे.

सोशल मीडियामुळं जग अतिशय जवळ आलं आहे असं म्हणायला हवं. जितके सोशल मीडियाचे फायदे आहेत तितकेच तोटे. मात्र तरीही दूरच्या मित्रांना नक्कीच सोशल मीडियानं जवळ आणलं आहे. यावरच फोटो मेसेजिंग अॅप इन्स्टाग्राम आता एका नव्या फीचरचं परीक्षण सध्या करत आहे. कॉलेजमधील आपले मित्र आपला ग्रुप अथवा आपले बॅटमेट्स या अॅपमुळं शोधणं आता सोपं होणार आहे. आपल्या मित्रांना शोधण्यासाठी हे अॅप आता मदत करणार आहे. एका अहवालात म्हटल्याप्रमाणं, ‘या फीचरमध्ये विद्यार्थ्यांना आपलं कॉलेज आणि वर्ष निवडावं लागेल. तसंच यामध्ये स्वतःचं प्रोफाईल बनवावं लागेल. ज्याच्या आधारे त्यांना आपल्या इतर मित्रांना भेटता येईल.’

सरळ मेसेज पाठवता येईल

यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या बॅचच्या मित्रांना सरळ मेसेज पाठवता येईल. तसंच एकदा ग्रुप तयार झाल्यावर सार्वजनिक मेसेजदेखील पाठवता येईल. तसंच विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचना, आपल्या कॉलेजविषयी सार्वजनिक करण्यात आलेली माहिती, तसंच आपण फॉलो करत असलेली अकाऊंट्स तसंच अन्य ठिकाणी करण्यात आलेलं कनेक्शन याद्वारे सर्वांना एकत्र आणता येईल.

- Advertisement -

इन्स्टाग्राम टीव्हीचीदेखील सुरुवात

इन्स्टाग्रामनं नुकतेच काही नवे फीचर्स आणले आहेत. यामध्ये इन्स्टाग्राम टीव्ही (आयजीटीव्ही), व्हिडिओ चॅट, फिल्टर्स या गोष्टी यामध्ये समाविष्ट आहेत. इन्स्टाग्रामचे सध्या १ अब्जापेक्षा अधिक जास्त युजर्स आहेत. आतापर्यंत केवळ फोटो शेअरिंग अथवा स्टोरी शेअरिंग करण्याची सुविधा इन्स्टाग्राममध्ये होती. इन्स्टाग्रामच्या डायरेक्ट मेसेजिंग सिस्टिमचा हा भाग आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये ने सुद्धा इन्स्टाग्राममध्ये व्हिडिओ कॉल बटण असल्याची माहिती दिली होती. तसंच आपल्या स्टोरीचा कोणी स्क्रिनशॉट घेत असल्यास, आपल्याला त्याचं नोटीफिकेशन येईल असं नवं फीचर आणण्याच्या तयारीतही इन्स्टाग्राम आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -