घरटेक-वेकMotorola Edge आणि Motorola Edge+ आज भारतात लाँच होणार

Motorola Edge आणि Motorola Edge+ आज भारतात लाँच होणार

Subscribe

Motorola Edge आणि Motorola Edge+ चा लाँचिंग कार्यक्रम आज भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० वाजता सुरू होईल.

स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोला आपला स्मार्टफोन Motorola Edge आणि Motorola Edge+ लाँच करणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन यापूर्वी ऑनलाईन स्पॉटही झाले आहेत. या व्यतिरिक्त या दोन स्मार्टफोनचशी माहिती लीक झाली होती. दरम्यान, आज हा स्मार्टफोन लाँच करणार आहेत. वापरकर्त्यांना या दोन्ही स्मार्टफोनमध्ये एक मजबूत कॅमेरा, कर्व्ह्ड ग्लास डिस्प्ले आणि शक्तिशाली प्रोसेसर मिळण्याची अपेक्षा आहे. Motorola Edge आणि Motorola Edge+ चा लाँचिंग कार्यक्रम आज भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० वाजता सुरू होईल.

Motorola Edge आणि Motorola Edge+ ची संभाव्य किंमत

मीडिया रिपोर्टनुसार कंपनी Motorola Edge आणि Motorola Edge+ ची किंमत ३०,००० ते ४०,००० रुपये असू शकते. याशिवाय हे दोन्ही स्मार्टफोन बर्‍याच कलर ऑप्शन्ससह खरेदी करता येतील. तथापि, दोन्ही स्मार्टफोनची वास्तविक किंमत आणि तपशील लाँचिंग प्रोग्रामनंतरच उपलब्ध होतील.

- Advertisement -

हेही वाचा – क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह Oppo A52 लाँच

Motorola Edge स्पेसिफिकेशन

लीक झालेल्या अहवालानुसार, कंपनी या स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देईल, ज्याचा रिझोल्यूशन 1080×2340 पिक्सल असेल. तसेच, वापरकर्त्यांना या फोनमध्ये ६ जीबी रॅमसह स्नॅपड्रॅगन 765 जी प्रोसेसर मिळू शकेल. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा उपलब्ध असण्याची अपेक्षा आहे. या स्मार्टफोनचा प्राथमिक कॅमेरा 64MP असण्याची शक्यता आहे.

Motorola Edge+ स्पेसिफिकेशन

मीडिया रिपोर्टनुसार, वापरकर्त्यांना या स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा एचडी डिस्प्ले मिळेल, ज्याचा रिझोल्यूशन 1080×2340 पिक्सल असेल. तसंच, कंपनी या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसरसह १२ जीबी रॅमसह उपलब्ध होऊ शकतो. या स्मार्टफोनचा प्राथमिक कॅमेरा 108MP चा असू शकतो. याची बॅटरी ५,१७० mAh असणार असल्याची चर्चा आहे. फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -